महाअपडेट टीम, 19 जानेवारी 2022 : महाराष्ट्राती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगर पंचायती, 2 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता आज 19 जानेवारी 2021 रोजी निकाल लागला.

एकूण 106 नगरपंचायतींपैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती आले असून 1802 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने 24 नगरपंचायतींमध्ये 416 जागांवर विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने 25 नगरपंचायतीमध्ये 387 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने 18 नगरपंचायतींमध्ये 297 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेने 14 नगरपंचायतींमध्ये 300 जागा मिळवल्या आहेत. इतर 16 ठिकाणी विजयी झाले आहेत.

वास्तविक बघायला गेलं तर या निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरताना दिसला असला तरी महाविकास आघाडीने सर्वाधिक जागांना कवेत घेतल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीला एकूण 984 जागांवर यश मिळालं आहे.

मतमोजणी अद्यापही सुरु असून निवडणुकीचा निकाल 9 नरपंचायतीचा निकाल उद्या सकाळपर्यंत स्पष्ट होईल. पण महाविकास आघाडीचा या निवडणुकीत बोलबोला असल्याचं स्पष्ट दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *