शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 : अहमदनगरमध्ये नगरपंचायतीचे निकाल आज लागले. अनेक नगर पंचायत अगदी प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. आजी – माजी आमदार, तसेच स्थानिक प्रतिष्ठित यांनी हि लढाई अस्तित्वाची केलेली होती. कर्जतचा विचार केला तर नगर पंचायतीमध्ये आ. रोहित पवार बाजी मारणार कि माजी मंत्री राम शिंदे पुढे राहणार यावरून उत्सुकता ताणली गेली होती.
तर अकोल्यामध्ये पिचड पिता पुत्र गड राखणार का याची उत्सुकता होती आणि पारनेर मध्ये तर माजी माजी मंत्री विजय औटी वर्चस्वाची लढाई होती.
कर्जत नगरपंचायतीत आ. रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार देत 17 पैकी 15 जागा जिंकत सत्ता मिळवली. तर पारनेर नगरपंचायत ही कारण या ठिकाणी आ. निलेश लंके आणि माजी आमदार औटी यांनी हि लढाई अगदी अस्तित्वाची अन प्रतिष्ठेची केलेली होती. येथे कडवी टक्कर देऊनही या ठिकाणी पारनेर नगरपंचायत त्रिशंकू अवस्थेत आली.
सर्वच निवडणुकांत पक्षांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले असल्याचे चित्र दिसत होते. विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे –
- पारनेर नगरपंचायत :-
प्रभाग 1 : ठाणगे कांतीलाल शालुबाई (शिवसेना)
प्रभाग 2 : सुप्रिया सुभाष शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग 3 : योगेश अशोक मते (अपक्ष)
प्रभाग 4 : नवनाथ तुकाराम सोबले (शिवसेना)
प्रभाग 5 : नितीन रमेश अडसूळ (राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत)
प्रभाग 6 : निता विजय औटी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग 7 : विद्या अनिल गंधाडे (शिवसेना)
प्रभाग 8 : भूषण उत्तम शेलार (पारनेर शहर विकास आघाडी)
प्रभाग 9 : हिमानी रामजी नगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग 10 : सुरेखा अर्जुन भालेकर (पारनेर शहर विकास आघाडी)
प्रभाग 11 : अशोक फुलाजी चेडे (भाजपा)
प्रभाग 12 : विद्या बाळासाहेब कावरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग 13 : विजय सदाशिव औटी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग 14 : निता देवराम ठुबे (शिवसेना)
प्रभाग 15 : जायदा राजू शेख (शिवसेना)
प्रभाग 16 : युवराज कुंडलिक पठारे (शिवसेना)
प्रभाग 17 : प्रियांका सचिन औटी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
- कर्जत नगरपंचायत
प्रभाग 1 : ज्योती लालासाहेब शेळके (राष्ट्रवादी)
प्रभाग 2 : लंकाबाई देविदास खरात (बिनविरोध) (राष्ट्रवादी)
प्रभाग 3 : संतोष सोपान म्हेत्रे (राष्ट्रवादी )
प्रभाग 4 : अश्विीनी गजानन दळवी (भाजपा)
प्रभाग 5 : रोहिणी सचिन घुले (काँग्रेस)
प्रभाग 6 : मोनाली ओंकार ताटे (काँग्रेस)
प्रभाग 7 : सतिष उद्धवराव तोरडमल पाटील (राष्ट्रवादी)
प्रभाग 8 : भाऊसाहेब सुधाकर तोरडमल (काँग्रेस)
प्रभाग 9 : अमृत सिधर काळदाते (राष्ट्रवादी)
प्रभाग 10 : उषा अक्षय राऊत (राष्ट्रवादी)
प्रभाग 11 : मोहिनी दत्तात्रय पिसाळ (भाजपा)
प्रभाग 12 : नामदेव चंद्रकांत राऊत (राष्ट्रवादी)
प्रभाग 13 : सुवर्णा रविंद्र सुपेकर (राष्ट्रवादी)
प्रभाग 14 : ताराबाई सुरेश कुलथे (राष्ट्रवादी)
प्रभाग 15 : भास्कर बाबासाहेब भैलुमे (राष्ट्रवादी)
प्रभाग 16 : भैलूमे प्रतिभा नंदकिशोर (राष्ट्रवादी)
प्रभाग 17 : छाया सुनील शेलार (राष्ट्रवादी)
- अकोले नगरपंचायत
प्रभाग 1 : साै. मंडलिक विमल संतु – (शिवसेना)
प्रभाग 2 : चाैधरी सागर निवृत्ती – (भाजपा)
प्रभाग 3 : मनकर प्रतिभा वसंतराव (भाजपा)
प्रभाग 4 : हीतेष रामकृष्ण कुंभार (भाजपा)
प्रभाग 5 : नाईकवाडी सोनाली लक्ष्मिकांत (भाजपा)
प्रभाग 6 : रुपवते श्वेताली मिलिंद (राष्ट्रवादी)
प्रभाग 7 : शेख आरीफ शमसुद्दीन (राष्ट्रवादी)
प्रभाग 8 : वडजे बाळासाहेब काशिनाथ (भाजपा)
प्रभाग 9 : वैद्य शितल अमोल (भाजपा)
प्रभाग 10 : शेटे नवनाथ विठ्ठल (शिवसेना)
प्रभाग 11 : साै.वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भाजपा)
प्रभाग 12 : तमन्ना मोहसिन शेख (भाजपा)
प्रभाग 13 : साै.जनाबाई नवनाथ मोहिते (भाजपा)
प्रभाग 14 : शरद एकनाथ नवले (भाजपा)
प्रभाग 15 : नाईकवाडी प्रदिपराज बाळासाहेब (काँग्रेस)
प्रभाग 16 : शेणकर माधुरी रवींद्र (भाजपा)
प्रभाग 17 : शेळके कविता परशुराम (भाजपा)
- शिर्डी नगरपंचायत
प्रभाग 1 : सौ.अनिता सुरेश आरणे (अपक्ष) (बिनविरोध)
प्रभाग 5 : सौ. अर्चना अमृत गायके (अपक्ष) (बिनविरोध)
प्रभाग 8 : प्रसाद प्रकाश शेळके (अपक्ष) (बिनविरोध)
प्रभाग 10 : सौ. आरती संभाजी चौगुले (अपक्ष) (बिनविरोध)
प्रभाग 13 : सुरेश आरणे (अपक्ष) (बिनविरोध)
प्रभाग 14 : संभाजी नानासाहेब चौगुले (अपक्ष) (बिनविरोध)
One Response