शेतीशिवार टीम, 20 जानेवारी 2022 : स्टॉक मार्केटमध्ये, लोक सहसा असे स्टॉक शोधतात जे किमतीत स्वस्त आणि शानदार रिटर्न्स देतात. जे शेअर्स किमतीने स्वस्त असतात त्यांना पेनी स्टॉक म्हटलं जातं.

अनेक पेनी स्टॉक्सने (Penny stock) गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक.Flomic Global Logistics Ltd.

कंपनीच्या शेयर्सनी केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहे. कंपनीच्या शेयर्सनी गेल्या वर्षभरात 7600 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिला आहे.

1 लाखांचे झाले 77 लाख :-

1 जानेवारी 2021 रोजी Flomik Global Logistics चे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 1.95 रुपये होते. कंपनीचे शेअर्स 19 जानेवारी 2022 रोजी बीएसईवर 151.95 रुपयांवर बंद झाले आहेत.

या कालावधीत कंपनीच्या शेयर्सनी सुमारे 7,692% रिटर्न्स दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 1 जानेवारी 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर त्या पैशाचे सध्याचे मूल्य 77.92 लाख रुपये झाले असते.

216.30 रुपये हा स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक :-

Flomik Global Logistics चे शेअर्स 28 मार्च 2019 रोजी 35 पैशांवर होते. 19 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 151.95 रुपयांवर बंद झाले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 28 मार्च 2019 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 4.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 216.30 रुपये आहे. त्याच वेळी, स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 2.37 रुपये आहे. Flomik Global Logistics चे मार्केट कॅप सुमारे 110 कोटी रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *