शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 :  या निवडणुकीत आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजयराव औटी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु विजय औटी पुन्हा सत्ता काबीज करण्यास अपयशी ठरले असून शिवसेनेला 6 जागांवर समाधान मानावं लागलं आहे यामध्ये जय औटी यांच्या पत्नी जयश्रीताई औटी पराभूत झाल्या आहेत.

तर निलेश लंकेच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने 7 जागा जिंकल्या असल्या तरी  कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठता आलेला नाही. तर आता यामध्ये किंगमेकरच्या भूमिकेत शहर विकास आघाडी आली आहे.

शहर विकास आघाडीने 3 जागा जिंकल्या असून सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, शिवसेनेला शहर विकास आघाडीची साथ घ्यावी लागणार आहे. सध्या तरी पारनेर नगर पंचायतीच्या सत्तेची दोरी शहर आघाडी,  अपक्ष, व भाजप नगरसेवकांकडे आली आहे.  त्यामुळे निवडणूक संपली असली तरी सत्तेचा घोडेबाजार सुरू झाला आहे. उमेद्वारांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेच्या उमेदवार माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांचा राष्ट्रवादीच्या हिमानी बाळासाहेब नगरे यांच्याकडून पराभव. केवळ 13 मतांनी पराभव झाला. जयश्री औटी यांना 362 तर हिमानी नगरे यांना 375 मते मिळाली.

पारनेर नगरपंचायत निवडणूक 2022 निकाल 

विजयी उमेदवार

पक्षीय बलाबल 17 पैकी :- 

राष्ट्रवादी 7

शिवसेना 6

अपक्ष 1

शहर आघाडी 2

भाजप 1 

प्रभाग 1 :- ठाणगे कांतीलाल शालुबाई :- शिवसेना

प्रभाग 2 :- सुप्रिया सुभाष शिंदे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग 3 :- योगेश अशोक मते :- अपक्ष

प्रभाग 4 :- नवनाथ तुकाराम सोबले :- शिवसेना

प्रभाग 5 :- नितीन रमेश अडसूळ :- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत

प्रभाग 6 :- निता विजय औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग 7 :- विद्या अनिल गंधाडे :- शिवसेना

प्रभाग 8 :- भूषण उत्तम शेलार :- पारनेर शहर विकास आघाडी

प्रभाग 9 :- हिमानी रामजी नगरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग 10 :- सुरेखा अर्जुन भालेकर :- पारनेर शहर विकास आघाडी

प्रभाग 11:- अशोक फुलाजी चेडे :- भाजपा

प्रभाग 12 :- विद्या बाळासाहेब कावरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग 13 :- विजय सदाशिव औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग 14 :- निता देवराम ठुबे :- शिवसेना

प्रभाग 15 :- जायदा राजू शेख :- शिवसेना

प्रभाग 16 :- युवराज कुंडलिक पठारे :- शिवसेना

प्रभाग 17 :- प्रियांका सचिन औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू होणार झाली असून प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचेही प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले आहे. पारनेरच्या शहरवासीयांचा कौल कुणाला हे दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरसेविका सुरेखा भालेकर,विजेता सोबले,वैशाली औटी, विद्यमान नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या पत्नी मयूरी औटी, पारनेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय डोळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक चेडे,विजय औटी, शिवसेनेने शहराध्यक्ष नीलेश खोडदे यांच्या पत्नी स्वाती खोडदे या प्रमुख उमेदवारांसह 55 उमेदवारांचे भवितव्याचा निर्णय थोड्याच वेळात… Live Update

पारनेर नगर पंचायतच्या चार जागांसाठी काल 87.66 टक्के मतदान झाले असून, यात 13 उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले असून , एकूण १७ प्रभागांतील सर्व उमेदवारांचे आज होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे . पारनेर नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झाले होते.

आरक्षणासंदर्भात झालेल्या निर्णयामुळे त्या चार जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान झाले . या प्रभागासाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात होते . या चार प्रभागांतील एकूण 2811 मतदारांपैकी 2464 मतदारांनी आपला मतहानाचा हक्क बजावला.

यात 1373 पैकी 1221 स्त्रियांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर 1436 पैकी 1256 पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. दरम्यान, पारनेर नगर पंचायतसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच पारनेर शहर विकास आघाडी व भाजपा या तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *