पेन्शनधारकाच्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ ! शासन निर्णय जारी, पहा वयोगटानुसार पेन्शन वाढीची टक्केवारी..
राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेले मूळ पेन्शनमध्ये वयोमानावर 20 ते 100 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा लाभ तथा पेन्शनवाढ 1 जानेवारी 2024 पासून देय राहील. याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने मंगळवारी जारी केला.
वय वर्ष 80 ते 85 वयोगटातील पेन्शनधारकांना मूळ निवृत्तीवेतनाच्या 20 टक्के वाढ, 85 ते 90 वयोगटासाठी 30 टक्के, 90 ते 5 वयोगटासाठी 40 टक्के वाढ, 95 ते 100 वयोगटासाठी 50 टक्के वाढ तर 100 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकाला मूळ निवृत्तीवेतनाच्या 100 टक्के म्हणजेच दुप्पट पेन्शन देण्याचा निर्णयाचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला..
सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याची मागणी..
80 वर्षे व त्यावरील पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतनात केंद्र सरकारप्रमाणे वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे अधिकारी व कर्मचारी महासंघाने स्वागत केले आहे. नागपूरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी 14 डिसेंबर 2023 रोजीच्या सामूहिक रजा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि अधिकारी महासंघ पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले होते.
त्यानुसार सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. तसेच केंद्र सरकार व देशातील इतर 25 राज्यांप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे.