शेतीशिवार टीम, 5 फेब्रुवारी 2022 : PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे. आता जर कोणत्याही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे, म्हणजेच आता रेशनकार्डशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही…
नियमांमध्ये बदल करण्याचं कारण काय ?
या योजनेंतर्गत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकार हे पाऊल उचलत आहे. अनेक अपात्र लोक पीएम किसान (PM Kisan) योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी सरकार नियमात बदल करत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शिधापत्रिका (Ration card) आवश्यक असणार आहे.
पोर्टलवर भरावी लागणार डिटेल्स :-
आता जेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवर अर्ज कराल तेव्हा तुम्हाला तेथे शिधापत्रिकेची (Ration card) डिटेल्स भरावी लागणार आहे. त्यानंतरच तुम्ही पुढील प्रोसेस करू शकाल, म्हणजे तुम्हाला यासोबतच रेशन कार्ड पीडीएफ फॉर्ममध्ये (PDF form) अपलोड करावं लागेल.
रेशनकार्ड शिवाय तुम्हाला मिळणार नाहीत हे पैसे…
1 जानेवारीला केले होते पैसे ट्रान्सफर :-
केंद्र सरकारने 1 जानेवारी रोजी पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 10 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले आहेत आणि एप्रिल महिन्यात सरकार 11 व्या हप्त्याचे पैसे देखील ट्रान्सफर करू शकते, त्यामुळे पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला रेशनकार्ड अपडेट करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा पुढील हप्त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही….
शेतकऱ्यांना दरवर्षी मिळते 6000 रुपयांची आर्थिक मदत…
पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. हे 6000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सरकार 4 महिन्यांच्या अंतराने 2000-2000 रुपयांचे 3 हप्ते ट्रान्सफर करते.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय 2 हेक्टर लागवडी योग्य जमीन असणे देखील आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांकडे लागवडी योग्य जमीन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत…
पीएम किसान योजनेचा कधी येणार 11 वा हप्ता …
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 11 व्या हप्त्याचे पैसे एप्रिल महिन्यात जारी केले जाऊ शकतात. 1 जानेवारी 2022 रोजी, 10 व्या हप्त्याचे पैसे सरकारने 10.09 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले. यावेळी सरकारने 20,900 कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली होती.
पीएम किसान योजनेचं स्टेटस कसे तपासाल…
सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल.
या वेबसाईटच्या उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ क्लिक करा.
आता तुम्हाला ‘Beneficiary status’ वर क्लिक करावं लागेल.
तुमचं स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक यासारखे सर्व डिटेल्स भरावे लागतील…
प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, आपण लिस्टमध्ये आपले नाव तपासू शकता.
पैसे न मिळाल्यास या तक्रार कुठे कराल ?
पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109
ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in