Take a fresh look at your lifestyle.

उद्घाटनापूर्वी PM मोदींचं जिममध्ये वर्कआउट सेशन ; पहा Viral video…

0

शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते वर्कआउट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ PM मोदींच्या मेरठ दौऱ्याचा आहे. पंतप्रधान मोदींनी येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. 

यावेळी पंतप्रधान स्वत: जीमचा आनंद लुटताना दिसले. हे विद्यापीठ मेरठच्या सरधना शहरातील सलवा आणि काली गावांचा समावेश असलेल्या परिसरात सुमारे 700 कोटी रुपये खर्चून उभारलं जाणार आहे.

मेरठमधील या क्रीडा संकुलात पोहोचलेल्या PM मोदींनी येथे उपस्थित असलेल्या जिमला भेट दिली आणि स्वत: जिममध्ये व्यायाम करण्यास सुरुवात केली. जिम करण्यासोबतच पंतप्रधानांनी या जिम मशीन्सचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी येथे फिट इंडियाचं उदाहरण दिलं. पंतप्रधानांचा हा वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे क्रीडा विद्यापीठाचे नाव हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या नावावर आहे, ज्यांनी 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारताला 3 ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळवून दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.