देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएमईजीपी (PMEGP) योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी 10 ते 25 लाख रुपयांचे कर्ज दिलं जातं. (Unemployed youth provided loans ranging from Rs 10 to Rs 25 lakh to start their own employment.) उपलब्ध करून दिलं जातं.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये नवीन व कार्यरत असलेल्या पात्र वैयक्तीक व गट लाभार्थ्यांना सन 2021-22 करिता ऑनलाईन पोर्टलवर / ऑफलाईन अर्ज मागविण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आलं आहे.

या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना घेता येईल. PMEGP योजना 2022 अंतर्गत अधिकाधिक लोकांना कर्ज देण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. मित्रांनो, आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व माहिती जसे की अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता इ. देणार आहोत.त्यामुळे तुम्ही ही माहिती काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत वाचा…

या योजनेअंतर्गत, देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून कर्ज घ्यायचे आहे, त्यांना पीएमईजीपी (PMEGP) कर्ज योजना 2022 अंतर्गत अर्ज करावा लागणार आहे.

या योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं / तो स्वत:चा रोजगार सुरू करू शकतो. सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत कोणतीही संस्था पीएमईजीपी (PMEGP) अंतर्गत मदतीसाठी पात्र मानली जाऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीने PMEGP योजना 2022 अंतर्गत कर्ज घेतलं तर तुम्हाला तुमच्या श्रेणी नुसार कर्जाच्या रकमेवर अनुदान (Subsidy) देखील दिल जातं.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत दिलेलं अनुदान Subsidy..

या योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील बेरोजगार युवकांना ग्रामीण विभागात उद्योग सुरू करण्यासाठी 25% अनुदान दिलं जाणार असून शहरी विभागात उद्योग सुरू करण्यासाठी 15% अनुदान दिलं जाणार असून यामध्ये तुम्हाला 10% स्वतः पैसे द्यावे लागतील.

विशेष श्रेणी / OBC (SC, ST, OBC) माजी सैनिक व्यक्तीला ग्रामीण विभागात उद्योग सुरू करण्यासाठी 35% अनुदान दिलं जातं तर शहरी विभागात उद्योग सुरू करण्यासाठी 25% अनुदान दिलं जातं आणि यामध्ये तुम्हाला 5% पैसे स्वतः द्यावे लागतील.

PMEGP योजनेचा उद्देश :-

ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारीची समस्या सामान्य असून ती दिवसेंदिवस वाढतीये हे आपणा सर्वांना माहीत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने पीएमईजीपी (PMEGP) योजना सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत ज्या बेरोजगार नागरिकांना आपला रोजगार निर्माण करायचा आहे, त्यांना कर्ज दिले जाईल. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन देशातील नागरिक स्वावलंबी व्हावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सहभागी लाभार्थी

फळे, भाजीपाला, अन्नधान्य कडधान्ये, मसाला पिके, मत्स्य, दुध व किरकोळ वन उत्पादनांवर आधारीत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
वैयक्तीक लाभार्थी, युवक शेतकरी, महीला उद्योजक, कारागीर, भागिदार व मर्यादित दायित्व असलेले (LLP)
गट लाभार्थी – स्वयं सहाय्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक गट, संस्था / कंपनी , उत्पादक सहकारी संस्था इ.
एक जिल्हा एक उत्पादन ODOP ) अंतर्गत नवीन उद्योगांना तर सद्यस्थितीत कार्यरत एक जिल्हा एक उत्पादन ( ODOP ) व त्याबाहेरील ( NON ODOP ) आधारीत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तवृद्धी यासाठी लाभ
एक जिल्हा एक उत्पादनामध्ये नविन कार्यरत प्रकल्प / स्थानिक / पारंपारिक उत्पादने / भौगोलिक मानांकने प्राप्त उत्पादनांना प्राधान्य .

महत्वाच्या बाबी..

या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 प्रकल्पांना शासनाकडून पुरस्कार ही देण्यात येणार आहेत.
महिला, SC, ST, OBC, शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि NER अर्जदारांना अधिक अनुदान दिलं जाईल.
या योजनेची संपूर्ण प्रक्रिया शासनाने ऑनलाइन केली आहे.
अर्ज भरण्यापासून ते खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन आहे.

PMEGP योजना 2021 चे फायदे :-

या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वत:चा उद्योग आणि रोजगार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या जातीनुसार व क्षेत्रानुसार अनुदानात बदल करण्यात येणार आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2022 अंतर्गत, देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कर्ज दिले जाईल.
शहरी भागात PMEबेरोजगारांसाठी खुशखबर ! व्यवसायासाठी मिळवा 35% अनुदानावर मिळवा 25 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य…
GP साठी नोडल एजन्सी जिल्हा उद्योग केंद्र (DIC) आहे, तर ग्रामीण भागात, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ (KVIC) शी संपर्क साधला जाऊ शकतो.
या योजनेचा लाभ ज्या बेरोजगार तरुणांना स्वत:चा रोजगार सुरू करायचा आहे, त्यांनाच मिळणार आहे.

PMEGP योजना 2022 अंतर्गत तुम्ही कोणत्या प्रकारचे उद्योग सुरू करू शकता…

वन आधारित उद्योग
खनिज आधारित उद्योग
खादय क्षेत्र
शेती आधारित
अभियांत्रिकी
रासायनिक आधारित उद्योग
वस्त्रोद्योग (खादी वगळता)
सेवा उद्योग
अपारंपरिक ऊर्जा

जात / वर्ग अर्जदारांची यादी :-

अनुसूचित जाती (SC)
माजी सेवेकरी
अनुसूचित जमाती (ST)
अपंग
इतर मागासवर्गीय (OBC)
अल्पसंख्याक
सीमावर्ती भागात आणि टेकड्यांवर राहणारे लोक
महिला

PMEGP योजना 2022 ची पात्रता :-

अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
या योजनेतील अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
PMEGP कर्ज योजना 2022 अंतर्गत, अर्जदार किमान 8 वी पास असावा.
या योजनेंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हे कर्ज दिलं जाणार आहे. जुना व्यवसाय पुढे नेण्यासाठी हे कर्ज दिलं जात नाही.
कोणत्याही शासकीय संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीला या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
जर अर्जदाराला आधीपासून इतर कोणत्याही सबसिडी योजनेचा लाभ मिळत असेल, तरीही तो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजना 2022 चा लाभ घेण्यास पात्र नाही.
सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्थांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएमईजीपी (PMEGP) कर्ज योजना 2022 ची कागदपत्रे :-

अर्जदाराचे आधार कार्ड
पॅन कार्ड
जात प्रमाणपत्र
निवास प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

PMEGP योजना 2022 साठी अर्ज कसा करावा?

देशातील इच्छुक लोक ज्यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजना 2022 अंतर्गत अर्ज करायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.

सर्वप्रथम अर्जदाराला https://www.pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Register-New-User यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल.

त्यानंतर अर्जदाराला योजनेच्या Official Website वर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होमपेज आपल्या समोर उघडेल.

PMEGP योजना

या होम पेजवर तुम्हाला PMEGP Option चा पर्याय दिसेल. तुम्हाला या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुढील पेज ओपन होईल.

या पेजवर तुम्हाला PMEGP E -Portal चा ऑप्शन दिसेल.

तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Online Application Form of Individual या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल. रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये, तुम्हाला सर्व विचारलेल्या माहिती जसे की आधार कार्ड क्रमांक, अर्जदाराचे नाव, राज्य, जिल्हा, लिंग, पात्रता, मोबाइल क्रमांक, ईमेल, पॅन कार्ड क्रमांक, जन्मतारीख, पत्ता इत्यादी काळजीपूर्वक भराव्या लागतील.

ही सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला Save Applicant Data या बटणावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट काढा आणि तुमच्या जवळच्या kvic/KVIB किंवा DIC मध्ये सबमिट करा ज्या अंतर्गत तुम्ही कर्जासाठी अर्ज केला आहे. \

kvic (खादी आणि ग्रामोद्योग मंडळ) / dic (जिल्हा उद्योग केंद्र) / kvib द्वारे निवडलेल्या नोडल एजन्सीद्वारे मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल.

जर तुमचा प्रकल्प (Project) निवडला असेल तर तो बँकेकडे पाठवला जाईल, आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील.

बँक अर्जावर प्रोसेस करेल आणि ते तुमच्या प्रकल्पाच्या ठिकाणाची येऊन तपासणी करतील, यानंतर बँक कर्ज मंजूर करेल. बँकेकडून त्यानंतरची मंजुरी घेईल आणि kvic/kvib/dic मध्ये सबमिट करेल…

EDP प्रशिक्षण प्राप्त करा, EDP प्रशिक्षण प्रशिक्षण प्रमाणपत्र kvic / kvib / dic आणि बँकेत सबमिट करणं आवश्यक आहे. तुमची सबसिडी सरकारकडून बँकेला पाठवली जाईल.

ऑफलाईन अर्ज :-

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात ONLINE / OFFLINE अर्ज करावे.
बिज भांडवल : जिल्हास्तरावर जिल्हा ग्रमीण विकास यंत्रणा जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष – उमेद (MSRLM – UMED) यांच्याशी संपर्क साधावा.

आर्थिक मापदंड :-

वैयक्तिक लाभार्थी भांडवली गुंतवणूकीकरिता 35% अनुदान ( रु . 10.00 लाखापर्यंत ) मार्केटिंग व ब्रॅन्डींगसाठी 50 % अनुदान कमाल निधी केंद्र शासनाच्या विहीत मर्यादेत स्वयंसहाय्यता गटांतील सदस्यांना बीज भांडवल रु .40,000 / प्रति सदस्य ( ग्रामीणसाठी MSRLM व शहरीसाठी MSULM मार्फत )

भांडवली गुंतवणुक व सामाईक पायाभूत सुविधा , गट लाभार्थी 35 % अनुदान कमाल केंद्र शासनाच्या विहित मर्यादित इन्क्यूबेशन सेंटर अनुदान शासकीय संस्था- 100 % , खाजगी संस्था – 50 % अनुसुचित जाती व जमाली- 60 प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना 100% अनुदान

अधिक माहिती व संपर्कासाठी शासकीय कार्यालये :-

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी / प्रकल्प संचालक उपविभागीय कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी / जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा (DRDA) तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष / कृषि पर्यवेक्षक / गावातील कृषि सहाय्यक / जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सामुदाय संसाधन व्यक्ती (CRP) संपर्क क्र. : 022-25822992 | भ्रमणध्वनी क्र. : 9422132315 / 9833055417 / 9423176095

आपल्या शेतकरी, उद्योजक बांधवांसाठी :-  

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली शेतीशिवारच्या योजनेच्या बातमीची लिंक आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…

धन्यवाद… 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *