पीक फवारणी यंत्र योजना : 2022 ! पीक फवारणी यंत्रावर मिळवा 3000 ते 1 लाख 25000 पर्यंत अनुदान !

0

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र DBT सरकारी योजना सुरू केली आहे, या योजनेचे नाव महा DBT शेतकरी योजना म्हणजेच महाराष्ट्र थेट लाभ शेतकरी योजना आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या योजनेला महा डीबीटी (Maha DBT) शेतकरी योजना असे नाव देण्यात आले आहे. 

इतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रमाणेच महाराष्ट्र सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी अविरत कार्य करत असून त्यासाठी शेतकरी योजना राबवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीचे यांत्रिकीकरण किंवा कृषी यांत्रिकीकरणात मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत शेती अधिक विकसित करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असतात. तसेच काही बाबींसाठी अनुदान देखील दिले जात असते. जेणेकरून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेवू शकतील.

मात्र या नव – नवीन योजनांची शेतकरी बंधूंना माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की,फवारणी यंत्रासाठी अनुदान कसे मिळवायचे ? अर्ज कसा करावा? आणि यासाठी किती प्रमाणात अनुदान दिलं जातं. ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून लेख स्टेप बाय स्टेप लेख शेवटपर्यंत वाचा…

पीक फवारणी यंत्र म्हणजेच पीक संरक्षण अवजारे होय. या फवारणी यंत्राच्या किंमतीनुसार 50 टक्के अनुदान दिलं जात असते. यामध्ये 3 हजारांपासून 1 लाख 25 हजारापर्यंत अनुदान दिलं जातं आहे.

यात बॅटरी ऑपरेटर battery operator, सौर चलीत फवारणी यंत्र (solar sprepayer machine) ट्रॅक्टर माऊंटेड (tractor mounted) ट्रॅक्टर ऑपरेटर (tractor operator) अशा फवारणी यंत्रांचा समावेश होतो. या फवारणी यंत्रांच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊ.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

महाराष्ट्र निवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड
ओळखपत्र
शेतजमिनीची कागदपत्रे
जात प्रमाणपत्र
पासपोर्ट फोटो

अर्ज कसा कराल :-

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, शेतकरी महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी योजनेचे अधिकृत ऑनलाइन पोर्टल किंवा वेबसाइट वापरू शकतात किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट पोर्टलवर प्रवेश करू शकतात…

https://mahadbtmahit.gov.in

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने प्रथम पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे, नोंदणी केल्यानंतरच अर्जदार त्याचे लॉगिन आणि पासवर्ड टाकून अर्ज करू शकतो…

महा डीबीटी (Maha DBT) शेतकरी योजना रजिस्ट्रेशन :

1) नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत पोर्टल वर जा किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

2) होमपेजवर पोहोचल्यानंतर, नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

3) पुढील पोस्टवर तुमचा नंबर टाका आणि स्वतःसाठी युजर्स नेम आणि पासवर्ड तयार करा, पासवर्ड 8 ते 20 Character चा असावा हे लक्षात ठेवा, पासवर्डमध्ये संख्या, शब्द आणि विशेष Character वापरा.

4) आता तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी पडताळणी (OTP verification) किंवा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतर दिलेल्या नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा, अशा प्रकारे तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता….

5) आता झालं तुमचं महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्टेशन.. ( टीप : राज्यातल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्ट्रेशन करणं अति आवश्यक आहे) 

आता आपण पीक फवारणी यंत्राच्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा ? ते पाहूया…

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून आपला अर्ज या योजनेसाठी पात्र ठरवला जाईल.

3) यानंतर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सर्व योजनांची माहिती आपल्याला दिसेल. या मध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची अवजारे यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी आपल्याला ‘Choose items’ वरती क्लिक करायचे आहे.

4) यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक अर्ज open होईल. आपल्याला सर्वात मुख्य घटक प्रथम निवडायचे आहे. मुख्य घटकामध्ये कृषी यंत्रे अवजारे खरेदीसाठी अर्थसाह्य यावर क्लिक करावे.

5) यानंतर पुढची बाब आहे तपशील details. या तपशीलमध्ये आपल्याला ‘ट्रॅक्टर पॉवर टिलर चलीत अवजारे’ यावर क्लिक करायचे आहे.

6) यानंतर एचपी श्रेणी निवडा आणि यंत्रसामुग्री अवजारे ही उपकरणे निवडा. यातून पीक संरक्षण अवजारे संरक्षण अवजारे हा ऑप्शन निवडावा.

7) यानंतर मशीनचे प्रकार निवडा.

8)  मी पूर्व संमती शिवाय कृषी अवजारांची खरेदी करणार नाही, आणि केल्यास मला अनुदानास पात्र राहता येणार नाही या गोष्टीची जाणीव आहे.

9) माझ्या कुटुंबातील सदस्याच्या आणि माझ्या मालकीचा हा पावर ट्रेलर ट्रॅक्टर आहे. या दोन्ही बाबींवर क्लिक करायचे आहे.

10) यानंतर ‘जतन करा’ यावर क्लिक करायचे आहे.

11) यानंतर सर्व घटक तपशील यशस्वीरीत्या जोडले आहे. आपल्याला आणखी घटक जोडायचे आहेत का? असे दिसेल, जर तुम्हाला आणखी काही घटक जोडायचे असतील तर Yes करून जोडू शकता. नाहीतर No करून पुढे जावे.

12) यानंतर पुन्हा मुख्यपृष्ठावर आल्यानंतर आपल्याला ‘अर्ज करा’ यावर क्लिक करावयचे आहे. यानंतर आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्या आहेत का याची खात्री करून घ्या.

13) यानंतर ‘पहा’ वर क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या सर्व बाबी दिसतील. यावर आपल्या गरजेनुसार सर्व बाबींना प्राधान्यक्रम द्यावा.

14) ‘या योजनेंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्याच्या अटी- शर्ती. आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील’ यावर टिक करा.

15) यानंतर ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वीच या सर्व बाबींसाठी पेमेंट केलेलं होतं त्यामुळे आपल्याला पेमेंट करण्याचे ऑप्शन येणार नाही, परंतु 2021- 22 साठी अर्ज केलेला नसेल आणि नव्याने अर्ज करत असाल तर मात्र आपल्याला डायरेक्टली अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर पेमेंट ऑप्शन दिला जाईल.

16) आपला हा अर्ज पात्र झाल्यास त्यावर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यानंतर संमतीपत्र दिलं जाईल. या आधारे तुम्ही दिलेल्या कोटेशननुसार अवजार खरेदी करून बिल येथे जोडू शकता. आणि नंतर आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जाईल.

अशाप्रकारे सर्व प्रक्रिया करून तुम्ही पीक फवारणी यंत्रासाठी अनुदान मिळवू शकता…

आपल्या शेतकरी बांधवांसाठी :- 

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली शेतीशिवार ची बातमी आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…

Leave A Reply

Your email address will not be published.