शेतीशिवार टीम, 1 जुलै 2022 :- कृषी आणि फलोत्पादनात पेरणीपासून कापणी आणि खोदाईपर्यंत, कृषी यंत्रांचे विशेषतः ट्रॅक्टरचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ट्रॅक्टर हे असेच एक कृषी यंत्र आहे जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या काळात आधुनिक शेतीमध्ये बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्याची मागणी लक्षात घेऊन शासन ट्रॅक्टर व इतर कृषी यंत्रसामुग्री अनुदानावर देत आहे, जेणेकरून त्याचा फायदा शेती व बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना व्हावा हा यामागचा उद्देश आहे.

बागायती पिकांच्या उत्पादनात मोठे ट्रॅक्टर वापरणे फार कठीण आहे. बागकामात मुख्यतः लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर किंवा विडरचा वापर केला जातो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राबवलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर छोटी कृषी यंत्रे दिली जात आहेत.

या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी कृषी यंत्रे :-

2. पॉवर टिलर (8 HP किंवा अधिक)
3. पंपसेट (7.5 HP)
4. झिरोटील सीड ड्रिल, शुगरकेन कटर प्लांटर, रीपर, बाइंडर
5. पॉवर थ्रेशर
6. विनिंग फॅन, चीफ कटर (मॅन्युअल)
7. ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर
8. एरो ब्लास्ट स्प्रेअर
9. रोटाव्हेटर
10. सीडड्रिल / झिरोटील सीडड्रिल / मल्टी क्राफ्ट प्लांटर / रिज फॅरो प्लांटर
11. नॅपसॅक स्प्रेअर / फूट स्प्रेअर / पॉवर स्प्रेअर
12. लेजर लँड लेव्हलर
13. पंप सेट
14. स्प्रिंकलर सेट

शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रावर मिळणारे अनुदान :-

पॉवर टिलर साठी 8 BHP ते 20 BHP आतापर्यंत सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना वेगवेगळी अनुदाने दिली जातात. जे असे आहेत :-

पॉवर टिलर (8 BHP पेक्षा कमी) :-

सामान्य श्रेणीतील (General Category) च्या लाभार्थ्यांना कमाल रु. 50,000 /- पर्यंत अनुदान दिलं जातं.

SC /ST च्या लाभार्थ्यांना कमाल रु. 65,000 /- अनुदान दिलं जातं.

पॉवर टिलर (8 BHP आणि त्याहून अधिक) :-

8 BHP पेक्षा जास्त क्षमतेच्या पॉवर टिलरवर सामान्य श्रेणीतील (General Category) शेतकऱ्यांसाठी कमाल रु. 65,000 /- पर्यंत अनुदान दिलं जातं.

SC / ST च्या लाभार्थ्यांना कमाल रु. 85,000 /- अनुदान मिळतं. हे अनुदान 50% च्या मर्यादेत दिलं जातं.

 पॉवर टिलर अनुदान योजना : 2022 – कागदपत्रे :- 

7/12 व 8A ,
बँक पास बुक
आधार कार्ड
यंत्राचे कोटेशन,
परिक्षण अहवाल
जातीचा दाखला.
पासपोर्ट फोटो

 पॉवर टिलर अनुदान योजना : 2022  पात्रता :- 

योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ फक्त शेतकरीच घेऊ शकतो.
अर्जदाराच्या नावावर कमीत – कमी 1 एकर जमीन असणे आवश्यक.
ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेताचा 7/12 आणि 8-अ असावा.
लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यंत्राची लेखी मागणी मिळणे बंधनकारक असेल.

महा डीबीटी (Maha DBT) शेतकरी योजना रजिस्ट्रेशन : 

1) नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत पोर्टल वर जा किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

2) होमपेजवर पोहोचल्यानंतर, नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

3) पुढील पोस्टवर तुमचा नंबर टाका आणि स्वतःसाठी युजर्स नेम आणि पासवर्ड तयार करा, पासवर्ड 8 ते 20 Character चा असावा हे लक्षात ठेवा, पासवर्डमध्ये संख्या, शब्द आणि विशेष Character वापरा.

4) आता तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी पडताळणी (OTP verification) किंवा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतर दिलेल्या नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा, अशा प्रकारे तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता….

5) आता झालं तुमचं महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्टेशन.. ( टीप : राज्यातल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्ट्रेशन करणं अति आवश्यक आहे)

आता आपण महा डीबीटी (Maha DBT) पोर्टलवर पीक फवारणी यंत्राबाबत अर्ज कसा कराल ? ते पाहूया… (टीप : तुम्हाला ज्या यंत्रासाठी अजर करायचा आहे त्यांनी यंत्रात बदल करावा)

पॉवर टिलर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?  

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच  महाडीबीटी पोर्टल  वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये अर्ज करा  यावर क्लिक करा.

3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी पर्यंत बाबी निवडायच्या आहेत ‘कृषीयांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक करा.

4) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, तालुका , मुख्य घटक , तपशील मध्ये ‘पॉवर टिलर’ निवडा, एच पी श्रेणी मध्ये 8 HP निवडा ,गाव , शहर, व्हील ड्राईव्ह प्रकार, प्रकल्प खर्च श्रेणी, मशीन चा प्रकार इ. माहिती भरा. त्यानंतर ‘जतन करा’ वर क्लिक करा.

5) जतन केल्यानंतर तुम्हाला success झालं म्हणून एक नोटिफिकेशन दिसेल.

6) त्यानंतर तुम्हाला खाली तुम्ही ‘निवडलेल्या बाबी’ दाखवल्या जातील .

7) डाव्या बाजूला असलेल्या होम पेज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा नावाचा ऑप्शन दाखवला जाईल, त्या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल ते ok वर क्लिक करावे लागेल. एकदा ok वर क्लिक केल्यानंतर दुसरी बाब ऍड करू शकत नाही , बदल करायचा असेल तर पूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व करा.

8) हे नोटिफिकेशन पहिल्या नंतर आपल्याला खाली पहा नावाचे ऑप्शन दाखवलं जाते . त्यावर क्लिक करा . क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या बाबी आपल्यला दिसतील आता त्या बाबीना प्राधान्य क्रम द्यायचा आहे . 1,2,3,4 अशा प्रकारे क्रम द्यायचे आहे .

9) क्रम निवडल्यानंतर आपल्याला स्वयं घोषणा पत्र ला क्लिक करायचे आहे नंतर अर्ज सादर करा वर क्लिक करायचे आहे .

10) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल, सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल म्हणजेच लॉटरी लागेल. त्यानंतर तुम्ही सर्व कागदपत्रे जसे की, पॉवर टिलर कोटेशन / 7/12 आणि 8-अ / तपासणी अहवाल / जातीचा दाखला / बँक पासबुक फ्रंट पेज / अपलोड करावं लागेल. यानंतर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळेल व ते अनुदान डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होईल…

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली शेतीशिवार ची बातमी आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करायचा असेल ते खालील लिंक वर क्लिक करा.  

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना : 2022

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *