Take a fresh look at your lifestyle.

Ration Update : मोफत रेशन योजनेअंतर्गत लाभ न मिळाल्यास ‘या’ नंबरवर तक्रार करा ; आता, घरपोच मिळणार गहू-तांदूळ.

0

शेतीशिवार टीम : 13 जुलै 2022 :- Free Ration Update : केंद्र सरकारने गरीब आणि गरजूंसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक अशी पंतप्रधान गरीब कल्याण योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) आहे. याअंतर्गत लोकांना मोफत रेशन दिलं जात आहे. शिधापत्रिका असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तरी देखील त्याचा लाभ मिळत नाही. किंवा तुम्हाला मोफत रेशन मिळण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता…

तक्रार कुठे करायची ?

जर तुम्हाला पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळत नसेल तर तुम्ही वेबसाइट आणि ई-मेलद्वारे ऑनलाइन तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर वरून देखील तक्रार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमची तक्रार सहज करू शकता. तक्रारीमध्ये तुम्हाला तुमच्या रेशनकार्ड क्रमांकासह रेशन डेपोचे नाव द्यावे लागेल. याद्वारे मोफत रेशन तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

ऑनलाइन तक्रार कशी करावी ?

वेबसाइट आणि ई-मेलद्वारे ऑनलाइन तक्रारी नोंदवता येतील. ई-मेलद्वारे तक्रार करण्यासाठी, तुम्हाला cfood@nic.in वर मेल करावा लागेल. मात्र, या आयडीवर दिल्लीतील शिधापत्रिकाधारकच त्यांच्या समस्या मांडू शकतात. याशिवाय, तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट http://fs.delhigovt.nic.in वर देखील तक्रार दाखल करू शकता…

टोल फ्री नंबर वरून देखील करू शकता तक्रार !

यासंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी सरकारकडून टोल – फ्री क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकांवर कोणीही आपली तक्रार नोंदवू शकतो. यासाठी 1800110841 वर कॉल करायचा आहे. तुम्ही या टोल फ्री नंबरवर रेशन ब्लॉक झाल्याची तक्रारही करू शकता…

Leave A Reply

Your email address will not be published.