शेतीशिवार टीम, 2 मार्च 2022 : फसल विमा योजनेअंतर्गत विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना महिनाभर घरोघरी जाऊन विमा पॉलिसीची हार्ड कॉपी दिली जाईल. कृषी मंत्रालयाने ‘मेरी पॉलिसी, मेरे हाथ’ हे देशव्यापी अभियान सुरू केलं आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शनिवार, 26 फेब्रुवारी रोजी या अभियानाचा शुभारंभ केला. इंदूरपासून 35 किमी अंतरावर असलेल्या बुढी बरलाई गावात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेद्वारे देशभरातील ज्या शेतकऱ्यांनी हा विमा घेतला आहे, त्यांच्यापर्यंत पंतप्रधान फसल विमा योजनेची (पॉलिसी डॉक्युमेंट) कागदपत्रे पोहोचवणे हा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
‘मेरी पॉलिसी, मेरे हाथ’ मोहीम देशभरात महिनाभर चालणार असून यामध्ये रब्बी 2021-22 अंतर्गत विमा उतरवलेल्या सर्व शेतकर्यांना त्यांच्या घरी जाऊन पीक विम्याच्या हार्ड कॉपी दिल्या जातील. ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, ड्रोन, ई-सॅम्पलिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबतही जागरूक केलं जाणार आहे.
‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ द्वारे हे सुनिश्चित केलं जाणार आहे की, सर्व शेतकरी PMFBY अंतर्गत सरकारची धोरणे, जमिनीच्या नोंदी, दाव्याची प्रक्रिया आणि तक्रार निवारण यासंबंधी सर्व माहिती चांगल्या प्रकारे अवगत आहेत.
भारत सरकार की महत्वाकांक्षी "प्रधानमंत्री फसल बीमा योजना" के अंतर्गत फसल बीमा पॉलिसी वितरण महाअभियान "मेरी पॉलिसी मेरे हाथ" का शुभारंभ कार्यक्रम…#MeriPolicyMereHaath #मेरीपॉलिसीमेरेहाथ #PMFBY4FARMERS #AatmaNirbharKrishi https://t.co/A9i5VOyDHw
— Narendra Singh Tomar (@nstomar) February 26, 2022
प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ ला भेट देऊ शकता. अन्यथा, एखादी व्यक्ती पीक विमा मोबाइल अँप वापरू शकते किंवा बँक किंवा सीएससी (CSC) शाखेला भेट देऊ शकते.
जर एखाद्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असावीत, ती आधार कार्डची प्रत, बँक पासबुकचे पहिले पान, जमीन खसरा-खतौनी, राज्य सरकारने अधिसूचित केलेली इतर कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
#PMFBY प्रौद्योगिकी के इस्तेमाल से किसानों का सशक्तिकरण…
फसल बीमा ऐप ने किसानो को सीधे पंजीकरण करने, आवेदन की स्थिति और कवरेज के विवरण को ट्रैक करने में सक्षम बनाया; किसान 72 घंटे के भीतर फसलों के नुकसान की रिपोर्ट कर सकते हैं।#MeriPolicyMereHaath #मेरीपॉलिसीमेरेहाथ pic.twitter.com/RdgHujxBbA
— Narendra Singh Tomar (@nstomar) February 26, 2022
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पीक विमा अँपमुळे शेतकऱ्यांना थेट नोंदणी करणे, अर्जाची स्थिती आणि कव्हरेज तपशीलांचा मागोवा घेणे शक्य झालं असून शेतकरी आता 72 तासांच्या आत पीक नुकसानीची तक्रार करू शकतात.