शेतीशिवार टीम,1 मार्च 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : घरा-घरात येणारी वीज ही किती व्होल्टची असते ?
उत्तर : भारतातील घरा -घरांमध्ये येणारी वीज ही 230 व्होल्ट 50 Hz AC इतकी असते.
प्रश्न : सूर्याने आत्तापर्यंत आकाशगंगेच्याकिती फेऱ्या मारल्या आहेत ?
उत्तर : सूर्याने आतापर्यंत गंगेच्या 21 प्रदक्षिणा केल्या आहेत. आपली सौरमाला प्रति सेकंद सुमारे 230 किलोमीटर वेगाने फिरत आहे.
प्रश्न : जगातील पहिली कागदी नोट कधी आणि कुठे छापली गेली ?
उत्तर : जगातील पहिली कागदी नोट चीनमध्ये तांग राजवंशाने (इ.स. 618-907) मध्ये बनवली होती.
प्रश्न : नवजात बाळाला मीठ आणि साखरेची चव कधी कळते ?
उत्तर : नवजात बाळाला चार महिन्यांपर्यंत मीठ किंवा साखरेची चव समजत नाही. चार महिन्यांनंतरच त्याला मीठ आणि साखरेतील फरक कळू लागतो.
प्रश्न : नवजात बाळाचा खरा रंग गोरा आहे कि सावळा हे कधी समजतं ?
उत्तर : बाळाच्या जन्मानंतर काही काळापर्यंत बाळाच्या त्वचेचा खरा रंग काय आहे हे कळत नाही. कारण तो सतत बदलत असतो. पण बाळाच्या त्वचेचा खरा रंग त्याच्या जन्मानंतर सहा महिन्यांनंतरच समजून येतो.
प्रश्न : मानवी लघवीमध्ये किती रसायन असतं ?
उत्तर : एका हेल्दी व्यक्तीमध्ये सामान्यत: लघवीमध्ये 95% पाणी असतं आणि इतर सामान्य घटक जसे की सोडियम – 0.4%, अमोनिया – 0.05%, फॉस्फेट- 0.6%, युरिया – 2%, सल्फेट – 0.2%. क्रिएटिन, युरोबिलिनोजेन आणि एरंडेल सारखे पदार्थ देखील आढळतात…
प्रश्न : जगातील सर्वात जास्त काळ गुलाम राहिलेला देश कोणता ?
उत्तर : भारत हा जगातील सर्वात जास्त वेळ ब्रिटीशांचा गुलाम राहिलेला देश आहे, इंग्रजांनी भारतावर तब्बल 200 वर्षे राज्य केलं.
प्रश्न : रेल्वेला एकूण किती गीअर्स असतात ?
उत्तर : 32 गीअर्स
प्रश्न : असा कोणता चित्रपट आहे, त्यात एकूण 71 गाणी आहेत ?
उत्तर : 1932 मध्ये बनलेल्या ‘इंद्र सभा’ने या चित्रपटाने गाण्यांच्या बाबतीत विक्रम केला. या चित्रपटात 71 गाणी होती. इतकी गाणी आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात दिसली नाहीत…
प्रश्न : कोणत्या लोकांना डास जास्त चावतात ?
उत्तर : एका संशोधनानुसार, ओ (O) रक्तगटाच्या लोकांना डास जास्त चावतात.
प्रश्न : पाण्यात टाकल्यानंतर थंड होण्याऐवजी गरम होणाऱ्या पदार्थाचं नाव सांगा ?
उत्तर : चुना
प्रश्न : भारतातील सर्वात उंच इमारत कुठे आहे अन् तिचं नाव ?
उत्तर : आत्तापर्यंत भारतातील सर्वात उंच इमारती ही इम्पीरियल टॉवर (Imperial Tower) आहे, ज्याची उंची 833 फूट आहे आणि त्याला 61 मजले आहेत. आता मुंबईतच वर्ल्ड वन World One ही 117 मजली इमारत बांधण्यात आली आहे, जी भारतातील सर्वात उंच इमारत मानली जाते. विकिपीडियानुसार, त्याची लांबी 8000 मीटर आहे आणि त्यात एकूण 76 मजले आहेत.
प्रश्न : भारतात कोणत्या व्यक्तीच्या वाहनाचं चलन करता येत नाही ?
उत्तर : देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान आणि भारताचे राज्यपाल यांच्या वाहनाचे चालान कोणीही कापू शकत नाही. आणखी एक गोष्ट जाणून घ्या की, राज्यपालांच्या गाडीला अपघात झाला तरी त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही…
प्रश्न : पृथ्वीवर अशी कोणती जागा आहे, तिथे दिवस अन् रात्रीचा एकाच वेळी अनुभव येतो ?
उत्तर : पृथ्वीच्या झुकण्यामुळे, आर्क्टिक सर्कल च्या ठिकाणी हे शक्य आहे. अलास्का, उत्तरी नार्वे आणि आइसलँडमध्ये दिवस- रात्रीचा एकत्रित अनुभव येतो. त्याचे काही व्हिडिओ यूट्यूबवरही उपलब्ध आहे.
प्रश्न : असा कोणता देश आहे, तिथे मुलीला किडनॅप करून लग्न केलं जाऊ शकतं ?
उत्तर : इंडोनेशियातील (Indonesia) सुंबा बेटावर ही वादग्रस्त परंपरा अजूनही सुरू आहे. या बेटावर जर एखाद्या तरुणाला जर एखादी तरुणी आवडत असेल तर तो तिला किडनॅप करून लग्न करू शकतो. परंतु तिच्या इच्छेविरोधात लग्न करूनही गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवले जात नाही. किडनॅप करून केलेला विवाह इथे योग्य मानला जातो कारण, तो इथल्या परंपरेशी निगडीत आहे.
प्रश्न : देशातलं पाहिलं वृत्तपत्र कधी व कोणतं प्रकाशित झालं ?
उत्तर : देशातील पहिले वृत्तपत्र 29 जानेवारी 1780 रोजी प्रकाशित झालं. हे बंगाल गॅझेटियर (Bengal Gazetteer) म्हणून ओळखले जात असे.
प्रश्न : एका वर्षात किती मिनिटे असतात ?
उत्तर : 525600 मिनिटे
प्रश्न : असं काय आहे, जे तारुण्यात हिरवं अन् म्हातारपणी लाल होतं ?
उत्तर : मिरची
प्रश्न : इतिहासातील सर्वात मोठा क्रिकेटचा सामना कधी आणि कोणादरम्यान खेळला गेला ?
उत्तर : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ सामना 1939 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला होता. 11 दिवस (3 मार्च ते 14 मार्च पर्यंत) चाललेला हा सामना आजही लोक विसरलेले नाहीत.