पुणे-औरंगाबाद ग्रीनफिल्ड महामार्ग : भूसंपादनातून जमीनदारांना मिळणार 6000 कोटींचा मोबदला ; 6-लेन सोबत सर्व्हिस रोडही होणार, पहा गावांची नावे…

1

Pune-Aurangabad Greenfield Expressway :- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे – औरंगाबाद एक्सप्रेस-वे च्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला जाणार असून भू-संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा एक्स्प्रेस वे सध्याच्या राज्य महामार्ग State Highway 27 (Maharashtra) चा एक जलद पर्याय असणार आहे.

याबाबत आपण अपडेट पाहिलं होतं की, अजून या महामार्गाबाबत जिल्हा नियोजनाची बैठक झाली नाहीये. बैठकीनंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी फायनल होणार आहेत. तर ती जिल्हा नियोजनाची बैठक महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या पुणे – औरंगाबाद या नियोजित 268 किलोमीटर लांबीच्या सहापदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस – वे च्या “भूसंपादनाच्या माध्यमातून सहा हजार कोटींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणारे भूसंपादन, जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील गावांसाठी सर्व्हिस रोड करणे, जिल्ह्यातील प्रमुख रस्ते महामार्गाला जोडणे व अन्य कामांचा आढावा घेत महिनाभरात भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात यावी असे आदेश देण्यात आले.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर या महामार्गाच्या कामाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सादरीकरण करण्यात आले.

तसेच भविष्यातील गरजा ओळखून हा पुणे – औरंगाबाद एक्स्प्रेस – वे अहमदनगर शहरालाही जोडण्यात यावा. अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिल्या.

Pune-Ahmednagar- Aurangabad :- Alignment – option 3 प्रमाणे महामार्ग प्राधिकरणाचे संचालक प्रफुल्ल दिवाण यांच्या मार्फत दाखवण्यात आलेले प्रात्यक्षिक खाली पहा…

एक्‍सेस कंट्रोल्ड हायस्पीड एक्‍स्प्रेस वे’ ने जोडल्या जाणाऱ्या या महामार्गामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. 140 किमी / तास या वेगाला सपोर्ट करणारा, नवा पुणे – औरंगाबाद महामार्ग हा आठ लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस – वे असणार आहे. त्यामुळे या दोन शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या सव्वा तासांत पूर्ण होणार आहे. तसेच अवजड वाहनांना अडथळा येऊ नये म्हणून पादचारी, सायकलधारी आणि दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे.

सध्या असलेल्या अहमदनगर – पुणे एक्सप्रेस – वे च्या शेजारूनचं म्हणजे 8 ते 12 Km अंतरावरुन हा नवा एक्सप्रेस वे जाणार असून टोटल अंतर हे 260 Km असणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जवळपास 123 तर पुणे जिल्ह्यात 116 Km चा एक्स्प्रेस – असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड – शिवापूर येथून या एक्सप्रेसवेला सुरुवात होणार असून पुरंदर, हवेली, शिरूर या तीन तालुक्यांतुन हा एक्सप्रेस वे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, नगर, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांचा समावेश असून हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून औरंगाबाद शहरात प्रवेश करेल.

या तिन्ही जिल्ह्यातील तालुके आणि समाविष्ट गावे पहा :-

पुणे जिल्हा :-

पुरंदर तालुका :- खेड – शिवापूर येथून स्टार्ट होऊन – शिवरे, गराडे, चांभळी, पवारवाडी, सासवड

हवेली तालुका :- वळती, उरळी कांचन, कोरेगाव मूळ

शिरूर :- हिंगणवाडी, देवकरवाडी, पानवली, आंबळे, कर्डे, गोलेगाव,

अहमदनगर जिल्हा :-

श्रीगोंदा तालुका :- हिंगणी, देवदैठण (ढवळे वस्ती)

पारनेर तालुका :- पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डे, बाबुर्डी, रुई छत्रपती, पिपरी गवळी, रायतळे, अस्तगांव, सारोळा कासार

नगर तालुका :- बाबुर्डी घुमट, उक्कडगाव, भातोडी पारगाव, मराठवाडी, दगडवाडी

पाथर्डी तालुका :- देवराई, शिरापूर, तिसगाव, निवडुंगे, सैदापूर, प्रभू पिंपरी, सुसारे

शेवगाव :- मुर्शदपूर, हासनापूर, वारखेड, चापडगाव, प्रभू वडगाव,

औरंगाबाद जिल्हा :-

पैठण तालुका :- खडके, मडके, साईगाव, दादेगाव जहागीर, पानठेवाडी, कांजरखेडा, वरुडी बुद्रुक, वावा, वडाळा, डोणगाव (पैठण), पोरगाव तांडा, वरवंडी खुर्द, घरडोण, आडगाव, झाल्टा, सुंदरवाडी, रामपूर, मल्हारपूर, पासून औरंगाबाद – जालना समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.

Road Map Alignment… पाहण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन व्हा

group लिंक :- https://chat.whatsapp.com/GMVgJ3y1WAN9DJ95cbHK9N

Leave A Reply

Your email address will not be published.