शेतीशिवार टीम : 12 जुलै 2022 :- गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, कांदापात, पुदिना, अंबाडीच्या भावात वाढ झाली असून चाकवत आणि मुळेच्या भावात घट झाली आहे. तर मेथी, शेपू, करडई, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर आहेत.
घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 3 रुपये, कांदापात चार रुपये, पुदिना 5 रुपये आणि अंबाडीच्या भावात 2 रुपयांनी वाढ झाली आहे.
तर मुळ्याच्या भावात जुडामागे तब्बल दहा रुपयांनी घट तर चाकवत दोन रुपयांनी घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी काथाबराचा आवक 90 हजार जुडी तर मेथीची 50 हजार जुडीची आवक झाली आहे.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव कोथिंबीर : –
2000 – 2500, मेथी : 1200-1500, शेपू 1000-1200, कांदापात : 1500-2000 , चाकवत :600-800, करडई : 600 -800, पुदिना : 500-1000, अंबाडी : 600-800 मुळा : 1500-2000, राजगिरा : 600-1000, चुका : 800-1200, चवळई : 600-800, पालक 1200-1500.