पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता पुणे शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेमध्ये वनाज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक आणि पीसीएमसी ते दिवाणी न्यायालय (सिव्हिल कोर्ट) पर्यंतच्या सेवेची सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली आहे. उद्या मंगळवार (दि. 1 ऑगस्ट) पासून दुपारी तीन वाजल्यानंतर सेवा पुणेकरांसाठी उपलब्ध असणार आहे.
त्यातील गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय हा विस्तारित मार्ग सुरू असणार आहे. या मार्गावर रविवारी पुणे मेट्रोकडून ट्रायल रन घेण्यात आली मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबल्यानंतर ही विस्तारित सेवा सुरू होणार आहे आतापर्यंत तसेच , दिवाणी न्यायालय परिसरातही पीएमपी फीडर सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे वनाज ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका प्रवाशांसाठी मागील वर्षी खुली करण्यात आली.
गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गिकेवरील कामे अत्यंत वेगाने सुरू होती. एप्रिल 2023 अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेचे काम पूर्ण करून सी.एम. आर. एस. इन्स्पेक्शन करण्यात येणार होते. मात्र, आता 1 ऑगस्ट रोजी ही मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे या मार्गिकेवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका दिवाणी न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत.
टाइम टेबल आणि तिकीट दर पाहण्यासाठी :- इथे करा क्लिक..
ही मार्गिका खुली केल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रस्ता), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे मनपा, दिवाणी न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे.
पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते फुगेवाडी ही सेवाही गेल्या वर्षी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून ही मेट्रो फुगेवाडी ते दिवाणी न्यायालयापर्यंत येणार आहे. त्यात फुगेवाडी ते शिवाजीनगर ही उन्नत असणार आहे, तर शिवाजीनगरपासून दिवाणी न्यायालयापर्यंत भूमिगत मेट्रो असणार आहे.
पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार होणार प्रदान..
लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्नान म्हणून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आरंभ टिळक स्मारक संस्थेने 1983 मध्ये केला. देशाची प्रगती आणि विकास यासाठी कार्य केलेल्या, तसेच त्या बाबतीत उल्लेखनीय आणि विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला दर वर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिग्गजांमध्ये डॉ. शंकर दयाळ लामा, प्रणव मुखर्जी अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर. नारायणमूती, डॉ. इ. श्रीधरन या व्यक्तींचा समावेश आहे.