शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा गटाच्या विजयानंतर नागवडे कारखान्याच्या 12 जागांवर राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनलने विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. तर सोसायटी मतदार संघातही राजेंद्र नागवडे यांनी मोठा विजय मिळवत बाळासाहेब नाहाटा यांचा पराभव केला आहे.
सोसायटी मतदारसंघात किसान क्रांती पॅनलचे प्रमुख राजेंद्र शिवाजीराव नागवडे 25 मते – विजयी ) यांनी विजय मिळवला. तर सहकार पॅनलचे प्रविणकुमार बन्सीलाल नाहाटा (16 मते – पराभव ) यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
सोसायटी मतदार संघ :-
मतदार – 41
राजेंद्र नागवडे – 25
बाळासाहेब नहाटा -16
योगेश मगर – 00
परंतु संध्याकाळी विषयी जल्लोषात राजेंद्र नागवडे यांना भान न राहता त्यांनी ”सोसायटी मतदारसंघात बाळासाहेब नाहाटाला गाडला ! .. असा शब्दप्रयोग केल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियात पसरल्याचा पाहायला मिळत आहे.
नागवडे यांना आव्हान देणारे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, केशव मगर यांचाही समावेश आहे.
निकालानंतर जल्लोष करताना नागवडे यांनी सोसायटी मतदार संघात बाळासाहेब नाहटांना गाडला अशी आरोळी ठोकत आनंद व्यक्त केला. या आरोळीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.