शेतीशिवार टीम, 22 फेब्रुवारी 2022 : आजच्या काळातही आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. अशा सर्व कुटुंबांना शासनाकडून विविध योजनांद्वारे आर्थिक लाभ दिला जातो. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारता येईल. देशभरात यासाठी विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.त्याच नाव म्हणजे राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना.
या योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येतं.
आज आपण या लेखाद्वारे बाबासाहेब राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जसे ही योजना काय आहे ?, त्याचे फायदे, उद्देश, पात्रता, वैशिष्ट्ये, महत्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ…जर तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा…
राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना ची सुरुवात केंद्र शासनाच्या 14 नोव्हेंबर 1995 च्या शासन निर्णयानुसार झाली असून राज्यात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत हे अर्थसहाय्य दिलं जातं.
आवश्यक कागदपत्रे :-
1. मयत व्यक्तीचा जन्माचा दाखला वयाबाबत पुरावा. ( जन्म नोंद दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
2. घरातील करता पुरुष / स्त्री मृत्यू दाखला.
3. वारस व्यक्तीचे ओळखपत्र – शाळा सोडल्याचा दाखला मतदान कार्ड
4. रेशन कार्ड ( मयत व्यक्तीचे नाव कमी करून )
5.आधारकार्ड झेरॉक्स
6.नगरपंचायत / नगरपालिका / ग्रामपंचायत / यांचेकडील दारिद्रयरेषेखालील दाखला.
7.घरातील मयत पुरुष / स्त्री कार्टी कमावती व्यक्ती असलेला तलाठी यांचा दाखला.
टीप :-
घरातील करता पुरुष / स्त्री मृत्यू झाल्यानंतर 3 वर्ष्यांच्या आत लाभ घेणे बंधनकारक राहील…
Kutumb Arth Sahayy certificate
अर्ज कसा करावा :-
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसलिदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय / तहसलिदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय किंवा भेट द्या…