शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दैनंदिन संसर्गाचे प्रमाणही 11.05 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागही चिंतेत पडलं असून कोरोनाला आला घालण्यासाठी उपाययोजना करताना दिसून येत आहे.

संपूर्ण भारत देशात फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस व बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रातही रुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

परंतु एकीकडे आरोग्य विभागलसीचे 2 डोस देऊन बुस्टर डोस देण्याच्या तयारी असताना मात्र लसीचा एकही डोस न घेतलेल्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

राज्यातील 98 लाख नागरिकांनी आतापर्यंत करोना लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक लसीकरण झालेले राज्य असताना लोकसंख्येचा एक मोठा टप्पा लसीकरणापासून दूर राहिल्याचेही स्पष्ट झालं आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागणाऱ्या किंवा अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश जणांनी करोना लस घेतलेली नाही. काहीजणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

करोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या करोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत. परंतु, लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे करोना लस ही उपयुक्त असल्याचे सिद्ध झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी करोना लस घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *