शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : केमिकल स्टॉक्स (Chemical Stocks) ने गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न्स दिले आहे. गेल्या 10 वर्षात काही केमिकल स्टॉक्सनी लोकांना मालामाल केले आहे. या केमिकल स्टॉक्समध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांची इनवेस्टमेंट आता करोडो रुपयांवर पोहोचली आहे.

आपण अशाच 3 केमिकल स्टॉक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीला करोडोंमध्ये बदलण्याचे काम केले आहे. या केमिकल स्टॉक्सने 22,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे स्टॉक्स नेमके कोणते आहेत आणि त्यांनी आतापर्यंत गुंतवणूकदारांना किती रिटर्न्स दिला आहे ?

या केमिकल स्टॉक्सने 22,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिला :-

पुष्पक केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (Paushak Chemical manufacturing company) :-

केमिकल कंपनी Paushak limited ने जबरदस्त रिटर्न्स दिला आहे.10 जानेवारी 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 46.50 रुपयांच्या लेव्हाल वर होते. तर कालच 12 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 10,148.90 रुपयांवर स्टॉप झाले. Paushak च्या या शेअर्सने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 22,255 % रिटर्न्स दिला आहे. जर या शेयर्समध्ये 10 जानेवारी 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या ही रक्कम 2.23 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

अलकाइल एमाइन्स केमिकल्स (Alkyl Amines Chemicals Ltd.) ने 22,000% पेक्षा जास्त रिटर्न्स दिला :-

अलकाइल एमाइन्स केमिकल्स चे शेअर्स 6 जानेवारी 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 15.92 रुपयांच्या पातळीवर होते. 12 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स (BSE) वर 3,747.00 रुपयांवर स्टॉप झाले. कंपनीच्या शेअर्सने गेल्या 10 वर्षांत 22,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 जानेवारी 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या ही रक्कम 2.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

दीपक नाइट्राइट (Deepak Nitrite) ने 17,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिला :-

दीपक नायट्रेटचे शेअर्स 6 जानेवारी 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 15.40 रुपयांच्या लेव्हल वर होते. 12 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 2,614.75 रुपयांवर स्टॉप झाले.कंपनीच्या या शेअर्स गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 16,700 % रिटर्न्स दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 6 जानेवारी 2012 रोजी दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि आपली गुंतवणूक ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 1.67 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *