शेतकऱ्यांनो, यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून होणार सुरु ; FRP दरही ठरला, पण ‘हे’ काम केलं तरचं ऊस कारखान्याला जाणार, पहा…
शेतीशिवार टीम : 20 सप्टेंबर 2022 :- राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल त्यांनी यावेळी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे.
या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार असून यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात 137.36 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.
यंदाचा गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी 10.25 टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रिक टन 3050 रुपये एफआरपी (FRP) देण्यात येणार आहे. देशात सध्या 60 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात 30 लाख मेट्रिक टन साठा आहे.
यंदा देशातून 100 लाख मेट्रिक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रिक टन आहे. इथेनॉल निर्मितीत देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा 35% आहे . पुढील वर्षी 325 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.
साखर निर्यातीबाबत खुल्या सर्वसाधारण परवान्याबाबत आपन जनरल लायसन्स गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावळा घेण्यात आला. यावेळी ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती, महा ऊस नोंदणी बाबत चर्चा करण्यात आली.
त्यामुळे आता ‘हे’ महत्वाचं काम केल्यानंतरचं तुमचा ऊस कारखान्याला जाणार आहे. हे महत्वाचं काम म्हणजे आपल्या उसाची नोंदणी…
पहा, स्टेप बाय स्टेप फक्त 2 चं मि. अशी करा तुमच्या उसाची नोंदणी…(Maha-US Nondani 2022)
महाऊस नोंदणी : 2022 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून Maha-US Nondani 2022 हे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करावं.
डाऊनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा
डाऊनलोड केल्यानंतर महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक शेतकरी व ऊस नोंदणी हे पेज दिसेल त्याखाली ऊस क्षेत्राची माहिती भरा हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
नंतर ऊस तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, ही माहिती भरून ‘पुढे’ या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर / सर्वे नंबर भरून ‘पुढे’ या ऑप्शनवर क्लिक करा.
आता तुम्हाला हंगाम प्रकार / लागवड प्रकार, उसाची जात, ही ऑप्शनमधून निवडून खाली लागवड दिनांक, ऊस क्षेत्र ( गुंठ्यांमध्ये) किती आहे ते भरून ‘पुढे’ या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांची नावे दिसतील त्यापैकी तुम्हाला ज्या कारखान्याला ऊस द्यायचा आहे प्राधान्यक्रमानुसार 3 साखर कारखान्यांची नावे निवडायची आहे.
यांनतर घोषणापत्र वाचून माहिती सबमिट करा यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. धन्यवाद…