Take a fresh look at your lifestyle.

कांद्याने तर वांदा केलाच आता, तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारचा मोठा झटका !

0

शेतीशिवार टीम : 30 मार्च 2022 : शासनाच्या विविध धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसतो याच जिवंत उदाहरण आपण पाहिलं तर कांदा.सध्या कांद्याने शेतकऱ्याचे पूर्णपणे वांदे केले आहे. आपण जर पाहिलं तर, विक्रमी उत्पादन, गारपीट, उन्हाळी कांद्याची लवकर झालेली आवक या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे बाजार भाव पूर्णपणे कोलमडले आहेत.

आणि यामध्येच निर्यातीला मागणी असल्यामुळे कमी प्रमाणात होणारी निर्यात या सर्वांमुळे कांदा अक्षरशः तीन ते चार रुपये दराने शेतकऱ्यांना विकावा लागत असतानाच आता केंद्र सरकारने तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे.

देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाथीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने तूर डाळ आणि उडीद डाळ यांची आयात ‘मुक्त श्रेणी’मध्ये ठेवण्यासाठी मार्च 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आयातीवर कोणतेही बंधन राहणार नसल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना झटका बसला आहे.

सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी, देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि आवश्यक अन्नपदार्थांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक सक्रिय पाऊल म्हणून केंद्राने 31 मार्च 2023 पर्यंत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर आणि उडीद आयात करण्यास परवानगी दिली आहे.

सध्या आपण जर पाहिलं तरी सध्या तुरीचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते. हमीभावापेक्षा सुद्धा साधारणपणे तुरीला 1300 ते 14000 रुपये क्विंटल तुरीचे भाव शेतकऱ्यांना मिळत होते.

याच पार्श्वभूमीवर आता तूर आणि उडीद डाळीला मुक्त श्रेणीमध्ये आयात करण्यासाठी पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने आता डायरेक्ट व्यापारी तूर आणि उडीद डाळ खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे नक्कीच तुरीच्या वाढत्या भावावर लगाम लागणार आहे.

कारण 6700 पर्यंत भाव गेला तरी शेतकऱ्यांना अपेक्षा होती की भाव आणखी वाढेल. परंतु आता या निर्णयामुळे देशांतर्गत दरावर याचा परिणाम होणार असून सरकारने जर आयात केली तर भाव कधीही गडगडणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

या निर्णयामुळे पुढील आर्थिक वर्षात तूर आणि उडीद आयात धोरणाबाबतच्या सट्टेबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. हे सर्व स्टेकहोल्डर्सना लाभदायक ठरणारी स्थिर धोरणात्मक व्यवस्था देखील सूचित करते. सरकारच्या मते, या सक्रिय उपायामुळे देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी या डाळींची अखंडित आयात सुनिश्चित होईल. या डाळींच्या पुरेशा उपलब्धतेमुळे ग्राहकांसाठी त्यांच्या किमती कमी होतील अशी अपेक्षा आहे.

सरकारने 15 मे 2021 पासून ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयात करण्यास परवानगी दिली होती आणि ती केवळ 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध होती. त्यानंतर तूर आणि उडीद आयातीसंदर्भातील मोफत प्रणाली 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली.

काय आहे किंमत :

ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, 28 मार्च रोजी तूर डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 102.99 रुपये प्रति किलो होती, जी एका वर्षापूर्वी 105.46 रुपये प्रति किलोच्या तुलनेत 2.4 टक्क्यांनी कमी आहे. 28 मार्च रोजी उडीद डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किरकोळ किंमत 104.3 रुपये प्रति किलो होती, ती एका वर्षापूर्वी 108.22 रुपये प्रति किलोच्या तुलनेत 3.62 टक्क्यांनी कमी होती…

Leave A Reply

Your email address will not be published.