काहीतरी ठेवा रे…आता केंद्र सरकारने आणखी एक कंपनी काढली विकायला !

0

शेतीशिवार टीम : 31 मार्च 2022 : देशात मोदी सरकार आल्यापासून देशात खासगीकरण (Privatization) झपाट्याने वाढलं आहे. यामुळेच देशातील सरकार सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांच्या ताब्यात देत आहे.

आता लवकरच अशा कंपन्यांमध्ये आणखी एक सरकारी कंपनी जोडली जाणार आहे, जी सध्या सरकारी कंपनी आहे, मात्र लवकरच ही कंपनी खासगी होणार आहे. (Privatization of Companies) यासाठी भारत सरकारने ई-लिलावही सुरू केला आहे.

आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव ‘फेरो स्क्रॅन निगन लिमिटेड’ (FSNL) आहे. जी सध्या सरकारी कंपनी आहे, मात्र लवकरच सरकार ती खासगी कंपनीकडे सोपवणार आहे. यासाठी भारत सरकारने ई-लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी गुरुवारी म्हणजे आज वित्त मंत्रालयाकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.

याबाबत, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) चं म्हणणं आहे की,’भारत सरकार फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड (FSNL), MSTC लिमिटेडची 100% उपकंपनी, व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह धोरणात्मक विक्रीद्वारे निर्गुंतवणूक करणार आहे.

BDO India LLP प्रस्तावित निर्गुंतवणुकीसाठी व्यवहार सल्लागार म्हणून काम करणार आहे. MSTC ची उपकंपनी असलेल्या FSNL ची स्थापना 1979 मध्ये झाली. FSNL ची धोरणात्मक विक्री 2022-23 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा केंद्र सरकारला आहे. सरकारने 2022-23 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या निर्गुंतवणुकीतून 65,000 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.

फेरो स्क्रॅन निगन लिमिटेड कंपनी ही प्रक्रियेद्वारे लोखंड आणि पोलाद उत्पादना दरम्यान कचरा सामग्री मानल्या जाणार्‍या मलबा आणि अवशेषांपासून फेरस मिश्र धातुंवर प्रक्रिया करते. देशातील करोडो रुपयांच्या धातूंचे वार्षिक पुनर्वापर करणे हे या कंपनीचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे मौल्यवान कच्च्या मालाची बचत यामार्फत होते.

कंपनीचे कार्य आणि उपक्रम http://fsnl.nic.in/index.php या व्हेबसाइट वर पहा…

Leave A Reply

Your email address will not be published.