शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी किसान क्रांती पॅनेलने प्रत्येक गटात अधिक मताधिक्याने 21-0 अशी आघाडी घेऊन कारखान्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय मिळविला.
दिनांक 11/1/2022 रोजी सायंकाळी 7 वाजता एका पॅनलच्या काष्टी येथील सभेत सोसायटीचे चेअरमन साहेबांना राजेंद्र नगवडेंची कारखान्यात 21/0 ने सत्ता येणार असं म्हंटल होतं परंतु त्यावेळी उपस्थित सर्वांना हसू आवरलं नाही. परंतु आज निवडणुकीचा अंदाज 100 % खरा ठरला अन् सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडें पंसती मिळाली असल्याचं अधोरेखित झालं.
काल सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत चाललेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सत्ताधारी किसान क्रांती पॅनेलने मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पैनेलने पाचपुते – मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत आ. बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर, भाजपचे खासदार विखे समर्थक व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, जिजाबापु शिंदे, बाजारसमितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते या दिग्गजांचा धुव्वा उडविला.
पहा गटानुसार विजयी अन् पराभूत उमेदवारांची आकडेवारी :-
सोसायटी मतदार संघ :-
मतदार – 41
राजेंद्र नागवडे – 25
बाळासाहेब नहाटा -16
योगेश मगर – 00
महिला प्रतिनिधी गट :-
किसन क्रांती पॅनल :-
पाचपुते मंदाकिनी 9307 (विजयी)
औटी मेघा 9689 (विजयी)
सहकार पॅनल :-
पाचपुते प्रतिभा बबनराव 7537 (पराभूत)
काळाने सुरेखा सुभाष 6559 (पराभूत)
अनुसूचित जाती जमाती गट :-
किसन क्रांती पॅनल :-
जगताप बंडू नामदेव 10026 (विजयी)
सहकार पॅनल :-
सोनवणे राजेंद्र जगन्नाथ 6792 (पराभूत)
इतर मागास प्रवर्ग गट :-
किसन क्रांती पॅनल :-
हिरवे सावता लक्ष्मण 10,375 (विजयी)
सहकार पॅनल :-
बोरुडे उमेश किसनराव 6,390 (पराभूत)
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग गट :-
किसन क्रांती पॅनल :-
बरकडे भाऊसाहेब बाबा 9981(विजयी)
सहकार पॅनल :-
राहिंज अशोक बापूराव 6644 (पराभूत)
(अपक्ष)
राहिंज धोंडिबा बापू 94 (पराभूत)
बेलवंडी गट :-
किसन क्रांती पॅनल :-
लबडे भीमराव 9437 (विजयी)
रायकर लक्ष्मण 9970 (विजयी)
काकडे दत्तात्रय 9973 (विजयी)
सहकार पॅनल :-
शेलार आण्णासाहेब 6872 (पराभूत)
रायकर तुळशीराम उमा 6486 (पराभूत)
काकडे विकास ज्ञानदेव ६४०७ (पराभूत)
टाकळी कडेवळीत गट :
किसन क्रांती पॅनल –
नेटके भाऊसाहेब 9860 (विजयी)
दरेकर प्रशांत 9559 (विजयी)
रसाळ सुरेश 9723 (विजयी)
सहकार पॅनल
रसाळ लक्ष्मण 6536 (पराभूत)
गव्हाणे हरिश्चंद्र 6583 (पराभूत)
पवार रोहिदास 6603 (पराभूत)
लिपणगाव गट :-
किसन क्रांती पॅनल
जंगले विठ्ठल 9548 (विजयी)
गिरमकर जगन्नाथ 9892 (विजयी)
शिपलकर प्रशांत 9314 (विजयी)
सहकार पॅनल :-
मगर केशव 7480 (पराभूत)
भोयटे सीताराम 6481 (पराभूत)
कुरुमकर हरीभाऊ 6494 (पराभूत)
श्रीगोंदा गट :-
किसन क्रांती पॅनल :-
सुभाष आनंदराव शिंदे – 9970 (विजयी)
बाबासाहेब सहादू भोस 9874 (विजयी)
सहकार पॅनल :-
जिजाबापू पर्वती शिंदे – 6888 (पराभूत)
बापूसाहेब शामराव भोस – 6349 (पराभूत)
कोळगाव गट :-
किसन क्रांती पॅनल :-
घाडगे श्रीनिवास बाबुराव–9808(विजयी)
जगताप शरद सोपान–9,777(विजयी)
सहकार पॅनल
फराटे महादेव किसन–6,678(पराभूत)
थिटे देविदास विठोबा–6642(पराभूत)
काष्टी गट :-
किसन क्रांती पॅनल
नागवडे राजेंद्र शिवाजीराव–10563 (विजयी)
पाचपुते राकेश कैलास–9,683 (विजयी)
सहकार पॅनल :-
पाचपुते वैभव पांडुरंग–5981(पराभूत)
पाचपुते भगवानराव नारायणराव -6,630 (पराभूत)