शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल पार पडली असून आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे.
यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व भाजप आ. बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांत थेट लढत होत आहे. ही निवडणूक बॅलेट पेपर घेण्यात आल्यामुळे सध्या मतदान प्रकियेस उशीर झाला असून अजूनपर्यंत मतमोजणी सुरु असल्याचं समजलं होतं…
परंतु 21 जागांपैकी 19 जागांचा निकाल समोर आला असून यामध्ये राजेंद्र नागवडेच्या किसान क्रांती मंडळाने एकतर्फी विजयश्री खेचून आणला आहे. या 19 जागांमध्ये बेलवंडी गट/ टाकळी कडेवळीत गट श्रीगोंदा गट / कोळगाव गट / लिपणगाव गट / काष्टी गट / अनुसूचित जाती जमाती गट / महिला प्रतिनिधी गटांचा निकाल समोर आला असून यामध्ये महिला प्रतिनिधी गटातून आ. बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांना मोठा धक्का बसला असून मंदाकिनी पाचपुते यांनी 1770 मतांनी पराभूत केलं आहे.
या आधीही बेलवंडी गटात जेष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार याचा पराभव झाला आहे. भीमराव लबडे यांनी 2565 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला आहे.
महिला प्रतिनिधी गट :-
किसन क्रांती पॅनल :-
पाचपुते मंदाकिनी 9307 (विजयी)
औटी मेघा 9689 (विजयी)
सहकार पॅनल :-
पाचपुते प्रतिभा बबनराव 7537 (पराभूत)
काळाने सुरेखा सुभाष 6559 (पराभूत)
अनुसूचित जाती जमाती गट :-
किसन क्रांती पॅनल :-
जगताप बंडू नामदेव 10026 (विजयी)
सहकार पॅनल :-
सोनवणे राजेंद्र जगन्नाथ 6792 (पराभूत)
बेलवंडी गट :-
नागवडे गट :-
लबडे भीमराव 9437 (विजयी)
रायकर लक्ष्मण 9970 (विजयी)
काकडे दत्तात्रय 9973 (विजयी)
पाचपुते – मगर गट :-
शेलार आण्णासाहेब 6872 (पराभूत)
रायकर तुळशीराम उमा 6486 (पराभूत)
काकडे विकास ज्ञानदेव ६४०७ (पराभूत)
टाकळी कडेवळीत गट :
नागवडे गट –
नेटके भाऊसाहेब 9860 (विजयी)
दरेकर प्रशांत 9559 (विजयी)
रसाळ सुरेश 9723 (विजयी)
पाचपुते-मगर गट
रसाळ लक्ष्मण 6536 (पराभूत)
गव्हाणे हरिश्चंद्र 6583 (पराभूत)
पवार रोहिदास 6603 (पराभूत)
लिपणगाव गट :-
नागवडे गट
जंगले विठ्ठल 9548 (विजयी)
गिरमकर जगन्नाथ 9892 (विजयी)
शिपलकर प्रशांत 9314 (विजयी)
पाचपुते – मगर गट :-
मगर केशव 7480 (पराभूत)
भोयटे सीताराम 6481 (पराभूत)
कुरुमकर हरीभाऊ 6494 (पराभूत)
श्रीगोंदा गट :-
नागवडे गट :-
सुभाष आनंदराव शिंदे – 9970 (विजयी)
बाबासाहेब सहादू भोस 9874 (विजयी)
पाचपुते – मगर गट :-
जिजाबापू पर्वती शिंदे – 6888 (पराभूत)
बापूसाहेब शामराव भोस – 6349 (पराभूत)
कोळगाव गट :-
नागवडे गट :-
घाडगे श्रीनिवास बाबुराव–9808(विजयी)
जगताप शरद सोपान–9,777(विजयी)
पाचपुते,मगर गट
फराटे महादेव किसन–6,678(पराभूत)
थिटे देविदास विठोबा–6642(पराभूत)
काष्टी गट :-
नागवडे गट
नागवडे राजेंद्र शिवाजीराव–10563 (विजयी)
पाचपुते राकेश कैलास–9,683 (विजयी)
पाचपुते, मगर गट :-
पाचपुते वैभव पांडुरंग–5981(पराभूत)
पाचपुते भगवानराव नारायणराव -6,630 (पराभूत)
श्रीगोंदा गट :-
नागवडे गट :-
सुभाष आनंदराव शिंदे – 9970 (विजयी)
बाबासाहेब सहादू भोस 9874 (विजयी)
पाचपुते – मगर गट :-
जिजाबापू पर्वती शिंदे – 6888 (पराभूत)
बापूसाहेब शामराव भोस – 6349 (पराभूत)