Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan। खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार 10वा हप्ता ? तत्पूर्वी ‘हे’ महत्वाचं काम अर्जंट करून घ्या…

0

शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- देशातील शेतकरी सध्या PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन – दोन हजारांचे तीन हप्ते मिळतात. पुढील हप्त्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केली नाही.

गतवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 डिसेंबरला पैसे पाठवण्यात आले होते, त्यामुळे यंदाही 25 तारखेलाच सरकारकडून पैसे वर्ग होणार आहे.   पैसे मिळण्यास उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर (FTO) तयार न होणं. FTO जनरेट झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे.

शेतकऱ्यांनो हे काम लवकरात लवकर करून घ्या…

सरकारने PM Kisan योजनेंतर्गत रजिस्टर केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) आधार अनिवार्य केलं आहे. पोर्टलवर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणाची किसान कॉर्नरमधील eKYC ऑप्शनसाठी क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसं, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे सहज साध्य करू शकता…

यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
उजव्या बाजूला तुम्हाला काही टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा
आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP टाका.
जर सर्व काही ठीक झालं तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल. अन् तुमचा हप्ता लटकला जाऊ शकतो.

जर Invalid आलंच तर आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता..

Leave A Reply

Your email address will not be published.