Share Market : फक्त 1 रु. हा शेयर्स पोहचला 41 वर ; वर्षभरात एक लाखांचे झाले 39 लाख ; तुमच्याकडं आहे का ?
शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- Multibagger stock tips : शेयर मार्केटमध्ये योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास खूप चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते. शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी शेअर्स आहेत, ज्यांनी लोकांना सहज करोडपती बनवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या एका वर्षात खूप जास्त रिटर्न्स दिले आहेत.
असाच एक पेनी स्टोक म्हणजे टीटीआय इंटरप्रायजेस (TTI Enterprises).
1 वर्षात 1 रु. चा स्टॉक पोहचला 41 वर :-
टीटीआय एंटरप्राइझच्या (TTI Enterprises) स्टॉकने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 3,785% रिटर्न्स दिले आहेत. हा पेनी स्टॉक (Penny stock) 18 डिसेंबर 2020 रोजी 1.05 रुपयांवर बंद झाला, जो 20 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 40.80 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
फक्त 12 महिन्यांत 39 लाखांचे झाले 1 लाख रुपये :-
TTI एंटरप्राइझच्या (TTI Enterprises) शेअर्समधील एक लाखांच्या गुंतवणुकीवर आज एका वर्षात 38.85 लाख रुपये झाले आहेत. काल बीएसईवर (BSE) शेअर 0.99 टक्क्यांनी वाढून 40.80 रुपयांवर ट्रेंड करत होता. या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी या स्टॉकने 52.05 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. मात्र, तेव्हापासून त्यात प्रॉफिट-बुकिंग दिसून येत आहे.
फर्मचे मार्केट कॅप 99.20 कोटी रुपये झालं आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून TTI एंटरप्राइझचा स्टॉक 2,967 टक्क्यांनी वधारला आहे आणि एका महिन्यात 6.81 टक्क्यांनी वाढला आहे. टीटीआय एंटरप्राइझ (TTI Enterprises) ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. कंपनी शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते आणि अल्पकालीन आणि दीर्घकालीन वित्तपुरवठा करते.