फेब्रु – जानेवारीमध्ये Omicron आणणार कोरोनाची तिसरी लाट ; फेब्रुवारीत कोरोना रुग्णांचा आकडा पोहचू शकतो दिड लाखांवर….

0

शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : कोरोनाचा सर्वात संसर्गजन्य व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनने संपूर्ण देशात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. अशातच आता कोरोनाची तिसरी लाट तिसरी लाट देशात धडकणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटचा प्रभाव डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिसून येणार असून ओमिक्रॉनचे शिखर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला येण्याची भीती पद्मश्री, IITचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी एका नव्या अभ्यासात व्यक्त केली आहे. परंतु तिसरी लाट मात्र दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असू शकते असंही ते म्हणाले आहे.

स्टडीनुसार, प्रो. अग्रवाल यांनी त्यांच्या गणितीय मॉडेलच्या सूत्राच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. यापूर्वी प्रा. मॅथेमॅटिकल मॉडेल फॉर्म्युलाच्या आधारे दुसऱ्या लाटेनंतरच नवीन म्यूटेंट येऊन तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. त्यांच्या गणितीय मॉडेल फॉर्म्युल्याद्वारे कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रा. अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेत पसरलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटवर अभ्यास सुरू करून प्राथमिक अभ्यास प्रसिद्ध केला आहे.

त्यानुसार, आतापर्यंत समोर आलेल्या सर्व केस स्टडीमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे, परंतु फारसा जीवघेणा आढळलेला नाही. प्रो. अग्रवाल म्हणाले की, सप्टेंबर महिन्यातच तिसऱ्या लाटेबाबत केलेले मूल्यांकन खरे ठरताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये पसरल्यानंतर भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहे.

त्यांनी सांगितले की जेव्हा तिसरी लाट शिखरावर असेल, तेव्हा दररोज एक ते दीड लाखांपर्यंत संक्रमित रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. प्रो.अग्रवाल यांनी त्यांच्या गणितीय मॉडेल फॉर्म्युलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेव्हमध्येही अभ्यास केला होता. अहवालाबाबत त्यांनी केलेले मूल्यांकन बऱ्याच अंशी योग्य ठरल्याचं सिद्ध झालं आहे.

प्रो. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर कमी परिणाम होईल. त्यांच्यात लक्षणेही कमी आढळतील आणि ते लवकर बरे होतील. त्यांनी सांगितले की ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण लवकर बरे होतात. त्यांच्यात सामान्य सर्दीसारखी लक्षणे असतील पण दुसऱ्या लाटेसारखी त्रासदायक नसतील.

प्रो. अग्रवाल यांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खबरदारी घेणे आणि लस घेणे. ज्यांनी अद्याप लसीचा दुसरा डोस किंवा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांनी त्वरित लस घ्यावी. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावं.

प्रो. अग्रवाल यांचं असं म्हणणं आहे की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही. काही प्रतिबंधात्मक गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर पुरेसं आहे. गरज भासल्यास सौम्य लॉकडाऊन लागू केले जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.