शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : कोरोना महामारीमुळे गेले दीड वर्ष अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत हानिकारक ठरलं आहे. मात्र असे असतानाही शेअर मार्केटमधील अनेक कंपन्यांच्या शेयर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अशीच एक कंपनी सूरज इंडस्ट्रीज (Suraj Industries) आहे, जिच्या शेअरची किंमत 6500 % वाढली आहे. याच कारणामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तो 66 लाखांचा मालक झाला असता…
मार्केटमध्ये कशी आहे सूरज इंडस्ट्रीज कामगिरी :-
अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत वाढली. जर आपण गेल्या एका महिन्याबद्दल बोललो, तर या काळात केवळ कंपनीचे शेअर्स 32.80 रुपयांवरून 78.15 रुपयांपर्यंत वाढले.
म्हणजेच या काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये 140% ची उसळी पाहायला मिळाली. तर गेल्या 6 महिन्यांवर नजर टाकली तर शेअरची किंमत 2.24 रुपयांवरून 78.15 रुपयांपर्यंत वाढली आहे.
तर वर्षभरापूर्वी सूरज इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत फक्त 1.95 रुपये होती. एका वर्षात किंमत 3900% वाढली. सूरज इंडस्ट्रीजचे शेअर्स एका वर्षात 1.18 रुपयांवरून 78.15 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
गुंतवणुकीवर किती मिळाले रिटर्न्स :-
जर एखाद्या व्यक्तीने महिन्यापूर्वी सूरज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 2.40 लाख झाले असते. 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 35 लाख झाले असते.
आणि जेव्हा शेअरची किंमत 1.95 रुपये होती, तेव्हा जर कोणी एक लाख रुपये गुंतवले असेल तर आज तो 40 लाखांचा मालक असेल. त्याचप्रमाणे, शेअरची किंमत 1.18 रुपये असल्यास, ज्याने 1 लाख रुपये गुंतवले आहेत तो आज 66 लाखांचा मालक असेल.