मधुमेहींनी असं करावं चाकवत भाजीचं सेवन ; ब्लड शुगर लेव्हल नेहमी नियंत्रणात राहील ..

0

शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागत असते. पण जर तुम्ही थोडासाही निष्काळजीपणा केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी ते घटक ठरू शकते. खरं तर, मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. औषध-गोळ्यां व्यतिरिक्त तुम्ही यासाठी काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. विशेष म्हणजे या घरगुती उपायांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेही रुग्णांच्या वाढलेल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चाकवतची घरगुती रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया शुगर कंट्रोल करण्यासाठी चाकवत भाजी कशी प्रभावी आहे.

चाकवत भाजी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे :-

मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चाकवत हि भाजी प्रभावी मानली जाते. चाकवत ही प्रामुख्याने हिवाळ्यातील भाजी आहे.
या भाजी मध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, अँटीऑक्सिडंट्स,आयरन मुबलक प्रमाणात असते. हे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी चाकवत खूप प्रभावी आहे. याशिवाय अनेक छोटे-मोठे आजार बरे करण्यातही ते खूप उपयुक्त आहे.

चाकवत भाजीची इतर नावे :
शास्त्रीय नाव – Chenopodium album
इंग्लिश नाव – Pigweed, Goosefoot, Fat-hen
हिंदी नाव – बथुआ

मधुमेहाच्या रुग्णांनी अशा प्रकारे चाकवतचे सेवन करावे :-

1. चाकवत भाजीचा पराठा :-

तुम्ही चाकवत भाजीचा पराठा बनवून सेवन करू शकता. यासाठी प्रथम चाकवत ची पाने पाण्यात उकळा. त्यानंतर ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ आणि लाल तिखट घालून मळून घ्या. यानंतर गरमा गरम पराठे खा .

2. चाकवत रायता :-

मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात चाकवत रायता देखील समाविष्ट करू शकतात. यासाठी प्रथम चाकवत ची पाने उकळून घ्या आणि नंतर त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट दह्यात घाला आणि नीट मिक्स करा. त्यानंतर वरून मीठ, लाल तिखट आणि भाजलेले जिरे टाका. घ्या चाकवत रायता तयार आहे.

3. चाकवत साग :-

चाकवत साग हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुम्ही चाकवत हिरव्या सागच्या भाज्या मोहरी आणि पालक घालून मस्त हाटिव भाजी बनवा आणि ही हिरवी भाजी रोटी आणि पराठ्यासोबत खाऊ शकता.

1 पचनक्रिया योग्य ठेवते :-

चाकवतमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे चाकवत भाजीचा तुमच्या आहारात समावेश करा.

2. वजन कमी करण्यासाठी प्रभावी:-

चाकवत वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते आणि तसेच प्रोटिन्सही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चाकवत आहारात समावेश नक्की करा, खास हणजे हिवाळ्यात.

3. केस मजबूत ठेवते:-

जर तुम्हाला तुमचे केस गळती आणि कोरडेपणा च्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात चाकवतचा समावेश करा. यामध्ये प्रोटिन्स,व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स बलाक प्रमणात असतात , ज्यामुळे केसांची मुळे मजबूत राहतात. तसेच, हे आपल्या केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

Leave A Reply

Your email address will not be published.