मागील आठवड्यात वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 35 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र आता मध्य प्रदेशमधून बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असून कांद्याच्या दरात हळूहळू घसरण होत आहे. सोमवारी कांद्याचे दर 30 रुपये प्रतिकिलो होते. तसेच टोमॅटोचीही आवक वाढली असून बाजारातील दरही निम्म्यावर आले आहेत. एपीएमसीत 18 ते 22, तर किरकोळमध्ये 30 रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे.
आवक वाढल्यानंतर टोमॅटोचे दर आणखी खाली येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एपीएमसीत मागील दोन आठवड्यांपूर्वी कांद्याची दरवाढ सुरू झाली होती.
अतिवृष्टीमुळे टोमॅटो नाशिक, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टोमॅटोची केलेली लागवड पाण्याखाली गेली होती. हाती आलेले पीक डोळ्यांदेखत सडू लागले होते. त्यामुळे मुंबई एपीएमसाला होणारी टोमॅटोची आवक कमी झाली होती. मागील एक – दोन महिन्यांत राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे साठवणुकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे, तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका बसला आहे .
त्यामुळे बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत होता. कांद्याचा पुरवठा कमी असल्याने एक नंबरवर असलेल्या कांद्याची दरवाढ झाली होती. उच्चतम प्रतीचा कांदा 20 टक्के, तर हलक्या प्रतीचा कांदा 80 टक्के दाखल होत होता.
त्यामुळे बाजारात मागील आठवड्यात एक नंबर असलेल्या कांद्याला 25 ते 35 रुपये , तर हलक्या प्रतीच्या कांद्याला 20 ते 25 रुपयांचा दर मिळत होता. दरवाढ पाहून मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्यास सुरुवात केली. सोमवारी बाजारात 158 गाडी कांद्याची आवक झाली.
CMEGP: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: असा करा अर्ज, आणि मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज
त्यामुळे परराज्यातील आवक वाढल्याने मागणीत घट झाल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली. मागील सोमवारी कांद्याला 25 ते 35 रुपये दर मिळाला होता, तर सोमवारी 20 ते 30 रुपये दर मिळाला. मात्र परराज्यातील वाढती आवक पाहता राज्यातील कांद्याला आगामी काळात चांगला दर मिळावा म्हणून व्यापाऱ्यांनी दरात घसरण केली असल्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवली आहे.
पहा आजचे कांदा बाजारभाव :-
काल राज्यातील सर्वाधिक दर सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला भेटला असून प्रतिक्विंटल 3900 पर्यंत दर होता.
आज खेड-चाकण बाजार समितीती कांदयाला प्रतिक्विंटल 3000 प्रमाणे दर मिळाला आहे. तर पुणे – पिंपरी बाजार समितीती 2500 प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
कोल्हापूर मार्केटमध्ये कांद्याचा किमान भाव 700 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 3100 रुपये प्रति क्विंटल आहे.
शेवगाव मार्केटमध्ये कांद्याचा किमान भाव 1800 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 3000 रुपये प्रति क्विंटल आहे.
पिंपळगाव बसवंत मार्केटला कांद्याचा किमान भाव 500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 3300 रुपये प्रति क्विंटल आहे.
औरंगाबाद मार्केटला कांद्याचा किमान भाव 400 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 2200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे.
मुंबई – कांदा बटाटा मार्केटला कांद्याचा किमान भाव 2000 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 3100 रुपये प्रति क्विंटल आहे.
नागपूर मार्केटमध्ये कांद्याचा किमान भाव 1500 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव 2700 रुपये प्रति क्विंटल आहे.
राहूरी -वांबोरी मार्केटला कांद्याचा किमान भाव 2000 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 3200 रुपये प्रति क्विंटल आहे.
कल्याण मार्केटला कांद्याचा किमान भाव 3000 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 3500 रुपये प्रति क्विंटल आहे.
नाशिक मार्केटला कांद्याचा किमान भाव 500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 2750 रुपये प्रति क्विंटल आहे.
संगमनेर कांद्याचा किमान भाव 2500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 3300 रुपये प्रति क्विंटल आहे.
आजचे टोमॅटो बाजारभाव :-
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
08/11/2022 | ||||||
खेड-चाकण | — | क्विंटल | 308 | 1000 | 2000 | 1500 |
कळमेश्वर | हायब्रीड | क्विंटल | 22 | 1530 | 2000 | 1860 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 20 | 1500 | 2000 | 1750 |