जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेल्या घोडगंगा सहकारी साखर निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काल रविवारी एकूण 13826 मतदारांपैकी 71.66% विक्रमी मतदान झाले असून निवडणूक रिंगणातील 41 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते.

आज सोमवारी (दि .7) सकाळी नऊ वाजता कानिफनाथ मंगलकार्यालय न्हावरे फाटा या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली होती व यामध्ये पहिलया फेरीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने आघाडी घेतली होती.

या निवडणुकीसाठी एकूण 21 जागा होत्या. परंतु, संस्थांच्या ब वर्गातून ऋषीराज अशोक पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 20 जागांसाठी या पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरुद्ध सर्वपक्षीय सर्वपक्षीय किसान क्रांती पॅनलचा असा थेट सामना झालेल्या निवडणुकीत किसान क्रांती पॅनलचा शेतकरी विकास पॅनलने दारूण पराभव केला आहे. किसान क्रांती पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं असून पॅनल प्रमुख दादापाटील फराटे यांचा सर्वसाधारण गट नंबर -1 मांडवगण फराटा गटातून निसटत्या 155 मताने विजय झाला आहेत.

CMEGP: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: असा करा अर्ज, आणि मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज

तर पॅनलमध्ये आ. अशोक बापू पवार यांनी सर्वसाधारण गट गट नंबर – 3 वडगाव रसाई गटातून सर्वाधिक 8187 मताधिक्य घेत पॅनलमध्ये टॉपवर राहिले.

गटनिहाय पहा निकाल. . .

मतदार संघाचे नाव सर्वसाधारण गट नंबर -1 मांडवगण फराटा :-

मतदार संघाचे नाव सर्वसाधारण गट नंबर – 2 इनामगाव :-

मतदार संघाचे नाव सर्वसाधारण गट नंबर – 3 वडगाव रासाई :-

मतदार संघाचे नाव सर्वसाधारण गट नंबर – 4 न्हावरे :-

 

 

मतदार संघाचे नाव सर्वसाधारण गट नंबर – 5 तळेगाव ढमढेरे :-

मतदार संघाचे नाव सर्वसाधारण गट नंबर – 6 शिरूर :-

मतदार संघाचे नाव राखीव महिला :-

 

मतदार संघाचे नाव अनुसूचित जाती जमाती :-

 

मतदार संघाचे नाव इतर मागासवर्ग :-

 

भटक्या विमुक्त जाती जमाती वि. मा. प्रतिनिधी :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *