शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! सोयाबीनच्या दरांमध्ये तेजी, ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर, पहा, आजचे सोयाबीन बाजारभाव
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सध्या वाढली आहे. दुसरीकडे सोयाबीनमधील ओलावा आता कमी येत आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढलेले असले, तरी देशातील दर काहीसे कमीच आहेत. पण, आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टॉक लिमिट 2 नोव्हेंबर रोजी एक पत्र जारी करून हटविल्याने सोयाबीन आधार मिळणार असून दरात तेजी येण्याचे संकेत आहेत.
देशात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने 8 ऑक्टोबरमध्ये स्टॉक लिमिट लावली होती. राज्यांना स्टॉक लिमिट ठरविण्याचे अधिकार दिले होते. मात्र, अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही . त्यामुळे केंद्राने लिमिट ठरवून 30 जून आणि नंतर 31 डिसेंबरपर्यंत स्टॉक लिमिट लावले होते. मात्र, या स्टॉक लिमिटमुळे मोठी किरकोळ विक्री साखळी आणि घाऊक व्यापाऱ्यांना व्यवहार करणे अवघड होत आहे.
CMEGP: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: असा करा अर्ज, आणि मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज
त्यामुळे स्टॉक लिमिट हटविण्यात आली आहे. राज्यात परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे प्रचंड नुकसान केले. परतीच्या पावसाने नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनचा दर्जा खालावू शकतो असा अंदाज शेतकऱ्यांना आला होता. जो शेतमाल पदरात पडणार आहे, त्याला काही चांगला भाव मिळणार नाही, ही बाब माहित असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता.
परंतु, अशात केंद्र शासनाने तेलबिया व सोयाबीनवरील निर्बंध उठविले. त्यामुळे व्यापारी आता खरेदीकडे वळतील. मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली जाईल. मागणी वाढल्याने सोयाबीनला चांगले भाव मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे. त्यातच मागील महिनाभरापासून सोयाबीन प्रतिक्विंटल 5 हजारांवर गेले नव्हते. परिणामी, बाजारात आवकही कमी दरात थोड्या प्रमाणात तेजी आली. शनिवारी सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल 5 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते .
300 ते 400 रुपये भाव वाढल्याने बाजारात सोयाबीनची होती. दरम्यान, आज 7 नोव्हेंबर रोजी सोयाबीनची आवकसुद्धा वाढल्याचे समोर आले आहे
CMEGP: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: असा करा अर्ज, आणि मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज
आज सोमवारी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत 10900 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आला असून राज्यातील सर्वाधिक प्रतिक्विंटल 6300 दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दरातील ही वाढ 7500 पर्यंत पोहचेल असे संकेत आहेत. त्यामुळे आगामी काळात बाजारात आवक वाढण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव पुढीलप्रमाणे आहेत
अकोला मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4400 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5665 रुपये प्रतिक्विंटल आहे.
कोपरगाव मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5800 रुपये प्रति क्विंटल आहे.
शेवगाव मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 5300 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 6000 रुपये प्रति क्विंटल आहे.
भोकर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4050 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5719 रुपये प्रति क्विंटल आहे.
औरंगाबाद मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5621 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे.
गंगाखेड मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 5400 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5500 रुपये प्रति क्विंटल आहे.
नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 4650 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव 5611 रुपये प्रति क्विंटल आहे.
लातूर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 5601 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 6153 रुपये प्रति क्विंटल आहे.
राहता मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4536 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5626 रुपये प्रति क्विंटल आहे.
श्रीरामपूर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4750 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5800 रुपये प्रति क्विंटल आहे.
कर्जत (अहमहदनगर) मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4560 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5900 रुपये प्रति क्विंटल आहे.