आता चप्पल घालून गाडी चालवणं महागात पडणार ; तब्बल ‘इतका’ होणार दंड, पहा वाहतुकीचे नवे नियम
शेतीशिवार टीम : 22 जुलै 2022 :- Indian Traffic Rules : भारत सरकार रस्त्यावरील वाहतुकीचे नियम आणि सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत कठोर होत आहे. 1989 च्या मोटार वाहन कायद्यात आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी वाहन उत्पादन मार्गदर्शक तत्त्वांमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. सिग्नल तोडणे, सीट बेल्ट न लावणे यासारख्या साध्या – साध्या नियमांमुळे सुद्धा आता दंड आकारला जाऊ शकतो. हे नियम ते आहेत जे रस्त्यावरील प्रत्येकाला माहित आहेत !
पण आता वाहतूक नियमात बदल केले असून त्या वाहतुकीच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत, ज्यामुळे तुम्हाला पुढील वेळी दंड देण्यापासून स्वतःला वाचवाल…
1. ‘चप्पल’ घालून गाडी चालवणे :-
मोटार वाहन कायद्यानुसार, भारतात टू व्हीलर चालवताना किंवा फोर व्हीलर चालवताना तुम्ही विशिष्ट पोशाख परिधान करणे आवश्यक आहे. या नियमानुसार (two wheeler) दुचाकीस्वारांनी वाहन चालवताना पूर्णपणे बंद शूज घालणे बंधनकारक आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 1 हजार रुपये दंड होऊ शकतो. त्याचप्रमाणे, मागे असलेल्या व्यक्तीने फूल पँट (full pant) घालणे आवश्यक आहे, अन्यथा 2,000 रुपये दंड होऊ शकतो.
2. गाडी चालवताना फोनवर बोलणे किंवा वापरणे :-
हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, परंतु याला एक अपवाद आहे. कोणत्याही रायडर (Rider) / ड्रायव्हरला(Driver) वाहन फक्त नेव्हिगेशनच्या उद्देशाने चालवण्यासाठी फोन वापरण्याची परवानगी आहे; इतर कोणत्याही गोष्टीसाठी ते वापरल्यास तुम्हाला नक्कीच दंड होईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
3.आपात्कालीन वाहनांना अडथळा निर्माण करणे :-
कोणत्याही आपत्कालीन सेवेच्या वाहनाला रस्ता देणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु अशा कोणत्याही वाहनाच्या मार्गात कोणी अडथळा आणताना आढळल्यास, त्याला 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आपत्कालीन वाहनांमध्ये अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस ताफा यांसारख्या इतर वाहनांचा समावेश आहे.
4. गाडी चालवण्यास असक्षम आढळल्यास :-
मद्यधुंद अवस्थेत किंवा कोणत्याही पदार्थाच्या नशेत वाहन चालवणे बेकायदेशीर आहे याची सर्वांना जाणीव आहे, परंतु कोणतीही व्यक्ती मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या वाहन चालविण्यास असक्षम असल्यास कायद्याने वाहन चालविण्यास मनाई आहे. तसेच, जर कोणी असे करताना आढळले तर त्यास पहिल्यांदा 1,000 रुपये आणि दुसऱ्यांदा 2,000 रुपये दंड होऊ शकतो.