शेतकरी माल विकूण कंगाल, व्यापारी मालामाल, बाजारपेठेत तुर खातेय चांगलाच भाव..
तालुक्यातील शेतकऱ्याकडे असलेला खरीप, रब्बीचा शेतीमाल सुगीत मिळेल त्या भावात विक्री करुन मोकळे झाले आहेत. सध्या शेतकऱ्याकडे विक्रीसाठी शेतीमाल नाही तर तो व्यापाऱ्याकडे आहे. तुर, चणा, गहू ज्वारी, बाजरी यंदा चांगला भाव खात असुन शेतकरी शेतीमाल विकूण कंगाल झाले तर बाजारपेठेत सध्या व्यापाऱ्याचा माल मालामाल होताना दिसत आहे.
भुधारक असो की, अल्प भुधारक शेतकरी असो निसर्गाच्या सततच्या अवकृपेने खते, बी – बियाणे ऊसणवार कर्ज काढूण पेरणी करण्याची वेळ गेली 4 वर्षापासून येत आहे. पेरणी, फवारणी, खुरपणीसाठी काढणी, मळणी, बारदाण्यावर उसणवार खर्च करून भाडे देऊन शेतीमाल बाजारपेठेत घेऊन जातात. त्यावेळी आडत बाजारात गेल्यानंतर आडत व्यावसायीक व व्यापारी मालाचा भाव ठरवतात. तो भाव योग्य असो की अयोग्य माल विक्री केल्या शिवाया शेतकऱ्याला पर्याय नसतो.
शेतकरी माल विकूण बारदाना डोक्यावर घेऊन माल विक्री केलेले पैसे खिशात टाकून उसणवार, कर्ज फेडतो. गेली वर्षासुन निसर्गाची अवकृपा असली तरी गेली २ वर्ष शेती मालाला चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी आच्छे दिन आले होते.
गतवर्षीपासुन शेतकऱ्याची सुगी पदरात पडताच सोयाबीनचे भाव घसरत आहे. यंदा शेतकऱ्याकडे लाल, पांढरी तुरीची आवक आसुन सध्या ११,५०० हजार रुपये तर चना ६ हजार, ज्वारी ३ हजार, गहु ३ हजार रुपयाने विकून बहुतेक शेतकरी मोकळे झाले आहेत.
कांही शेतकऱ्यानी पेरणीला आधार होईल म्हणून ५,१० कट्टे सोयाबीन ठेवले आहेत त्याचेही भाव आत्ता काय होतील ते सांगता येणार नाही.पेरणी नजीक आल्यावर ते विकल्या शिवाय शेतकऱ्यांना पर्याय ही नाही. शेतकरी होता तेवढा माला कमी भावात विक्री करुन ऊसणावार, दे घे करुन कंगाल झाले मात्र त्याच साठवलेल्या शेतकऱ्यांच्या शेती मालावर सध्या व्यापारी मालामाल होत आहेत.
व्यापाऱ्याची तुर, गहू, बाजरी, ज्वारी चांगलाच भाव खात आहे. शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात विक्री केली होती. त्याच मालावर सध्या व्यापारी मालामाल होत आहे. निसर्गाची अवकृपा, शासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे बाजारपेठेत व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतीमाला कवडीमोल भावात घेऊन स्वतः मालामाल होत आसल्याचे वास्तव चित्र सध्या बाजारपेठेत पहिला मिळत आसुन व्यापाऱ्याच्या नशीबी आच्छे दिन तर शेतकऱ्याच्या नशीबी फटफजितीचे दिवस पाहिला मिळत आहेत.