क्षणात होत्याचं नव्हतं झालं; सेल्फीच्या नादात दोन सख्ख्ये भाऊ बुडाले, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO …

0

शेतीशिवार टीम, 16 ऑगस्ट 2021 :- नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या परिसरात 15 ऑगस्ट रोजी सेल्फीच्या नादात दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दिनानिमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर धारण परिसरात गर्दी केले होती. यावेळी तेथे सेल्फी काढण्याचा मोह न आवरल्याने अनेक नागरिक सेल्फी घेण्यास रमले होते. याच दरम्यान पाय घसरल्याने दोन सख्खे भावंडे पाण्यात बुडाले.

मंगेश मधुकर जुनघरे (वय 37) व विनोद मधुकर जुनघरे (वय 35) दोघेही रा. रेवतकर ले आऊट उमरेड जिल्हा नागपूर असे बुडालेल्या युवकांची नावे आहेत.

काल 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असल्याने नागपुर जिल्हाच्या उमरेड वरुण दोन भाऊ आपल्या मित्रासोबत गोसेखुर्द धरणाकडे फिरण्यासाठी आले होते. दरम्यान गोसीखुर्द पावर हाऊस जवळ येत सेल्फी च्या मोह आवरता न आल्याने विनोद पाण्याजवळ उतरला. परंतु मातीच्या ढिगाऱ्यावरून विनोदच पाय घसरला अन् तो नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला.

मोठ्या भावाला हे कळताच मंगेशनेही नदीच्या प्रवाहात उडी मारत विनोदला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवाह जास्त असल्याने दोघं भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. विनोद जनुघरे याला 1 वर्षांची मुलगी आहे.तर मंगेश जुनघरे याला 4 वर्षांचा एक लहान मुलगा आहे.

दोन्ही भावंडे बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एसडीआरएफ आणि स्थानिकांनी तात्काळ शोधमोहिम हाती घेतली. मात्र, दुर्दैवाने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.