शेतीशिवार टीम,18 मे 2022 :- इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची कर्जमर्यादा 25 हजार रूपये वरून 1 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली असून या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 14 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आलेला आहे.
राज्यातील भटक्या जमाती / विमुक्त जमाती / विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थी, नागरिक आणि विधवा महिला अशा सर्वांना सूक्ष्म व्यवसायासाठी म्हणजे पिठाची गिरणी / किराणा दुकान / ब्युटी पार्लर / चप्पलचे दुकान किंवा इतर अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत अशा सर्व व्यवसायासाठी या 25 हजार रुपयांपर्यंत कर्ज या महामंडळाच्या माध्यमातून दिले जात होते.परंतु सध्याच्या महागाईच्या काळात 25 हजार रुपयाला काही किंमत राहिली नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता या महामंडळाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मर्यादा 1 लाखांपर्यंत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 14 फेब्रुवारी 2020 एक शासन निर्णय काढला होता. तो आपण पाहूया….
या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही योजना कशा प्रकारे राबविली जाणार आहे, उद्देश / पात्रता / कागदपत्रे / लाभ / फायदे / अटी – शर्ती अर्ज करण्याच्या पद्धतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही ही संपूर्ण माहिती शेवटपपर्यंत वाचा…
वसंतराव नाईक विकास महामंडळ योजनेचा उद्देश
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेली थेट कर्ज योजनेमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे, स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश आहे.
योजनांसाठी लघु व्यवसाय उदा .मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर, हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीटयुट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरुस्ती, ए. सी.दुरुस्ती, चिकन / मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम पार्लर व इतर..
मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोट दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करणे,
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ. लाभार्थीना तात्काळ / प्राथम्याने लाभ देणे.
शासन निर्णय पहा maharashtra.gov.in
वसंतराव नाईक विकास महामंडळ योजनेचे कागदपत्रे : –
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
जातीचे प्रमाणपत्र
राशन कार्ड
प्रोजेक्ट रिपोर्ट
एक पासपोर्ट साइज फोटो
वसंतराव नाईक विकास महामंडळ लाभर्थीच्या पात्रतेच्या अटी : –
लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असावा.
वय18 ते 50 वर्ष असावे
लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
वेबपोर्टल / महामंडळ संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
उमेद्वाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
उमेदवार कोणत्याही बॅंकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
उमेद्वाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हातालन्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
कुटुंबातील एक व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
वसंतराव नाईक विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज कसा कराल ?
सर्व प्रथम तुम्ही वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या ऑफिशिअल व्हेबसाइट वर जा… http://www.vjnt.in/Default.aspx
वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्या नंतर नोंदणी फॉर्म (Registration form) उघडेल.
या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.
जसे की,
पासपोर्ट फोटो
लाभार्थी प्रकार
अर्जदाराचे संपूर्ण नाव
अर्जदाराचे वडील किंवा पतीचे नाव
आईचे नाव
जन्म तारीख
वय
मोबाईल नंबर
ही सर्व माहिती भरल्या नंतर submit करा या ऑपशन वर क्लिक करा. खाली फोटो दिला आहे…
स्टेप 2 : पत्त्याचा तपशील..
यामध्ये तुम्हाला तुमचा करंट ऍड्रेस आणि पर्मनंट ऍड्रेस भरायचा आहे.
जिल्हा
तालुका
पिनकोड
अशी सर्व माहिती भरावी लागेल.
स्टेप 3 : Income /Business /bank details..
इनकम डिटेल्स मध्ये तुम्हला वार्षिक उत्पन्न किती आहे आहे ते टाकायचे आहे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या मध्ये असायला पाहिजे.
अगोदर तुमचा busines असेल तर yes करा नसेल तर no हे ऑपशन निवडा.
नंतर business चे नाव टाका.
अगोदर पासून business असेल तर त्याचा address टाका.
पुढे तुम्ही तुमच्या अगोदर च्या business साठी बँकेकडून Loan घेतले असेल तर Yes हे ऑपशन निवडा . नसेल तर no निवडा.
खाली business Details मध्ये जी माहिती विचारली आहे ती भरा.
bank details
यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर
खातेदाराचे नाव
बँकेचे नाव
बँक ब्रँच
IFSC code
पुढे तुम्हाला किती loan ammount पाहिजे ते टाका १ लाख रुपये पर्यंत रक्कम टाकू शकता.
पुढे business चे नाव टाकायचे आहे.
पुढे तुम्हाला कोणत्या बँक मधून loan हवे आहे ते सिलेक्ट करा.
ही सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटण वर क्लिक करा.
स्टेप 4 : docmument
यामध्ये तुम्हाला दिलेल्या सर्व ऑपशन ला टिक करा.
ऍड्रेस प्रूफ साठी आधार कार्ड अपलोड करा.
कास्ट सर्टिफिकेट
रेशन कार्ड
income certificate
business कोटेशन
हे document अपलोड करून submit बटण वर क्लिक करा.
पूढे तुम्ही फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता.अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता…
हेल्पलाईन नंबर :-
अहमदनगर : आनंद हवेली, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, कॉर्पोरेशन बँकेसमोर, अहमदनगर
फोन नंबर :- 0241 – 23240
Email :- vnvjntdcahmednagar@gmail.com
पुणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
बी विंग, तळ मजला, मेंटल हॉस्पींटल कॉर्नर, आळंदी रोड, विश्रांतवाडी, पुणे
फोन नंबर :- 020-26120776
Email :- vnvjntdcsataradm@gmail.com
One Response