भारतात हाय – वे आणि एक्सप्रेस – वेचे बांधकाम जितक्या वेगाने सुरू आहे, तितक्याच वेगाने देशाची प्रगती होत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2024 सालापर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असतील, याचा पुनरुच्चार अनेकदा केला आहे. असे दोन बोगदे भारतात बांधले जात आहेत, ज्यामुळे चीनलाही भारताने मागे टाकलं आहे.

भारताची ही प्रगती पाहून चीनचा तर जळफळाटचं होईल. मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर जगातील सर्वात रुंद बोगदा बांधण्यात येत आहे. आतापर्यंत चीनकडे जो रेकॉर्ड होता, आता हा प्रोजेक्ट पूर्ण होताच भारताच्या नावावर होणार आहे.

महाराष्ट्रातील या ठिकाणी जगातला सर्वात रुंद बोगदा..

मुंबई – पुणे एक्सप्रेस – वे वरील मिसिंग लिंकखाली जुळे बोगदे बांधले जात आहेत. हा बोगदा पश्चिम घाटाच्या वळणाच्या मार्गावर बांधला जात आहे. जेथे वळणदार रस्त्यांवर बांधलेल्या बोगद्यांची रुंदी कमी केली असून भारतातील अभियंत्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भारतीय अभियांत्रिकीने हा पराक्रम केला आहे. वळणदार रस्त्यावर जगातील सर्वात रुंद बोगदा बांधून भारतीय अभियंते चीनला हरवण्याच्या मार्गावर आहेत.

चीनलाही टाकलं मागे..

विशेष म्हणजे, सध्या चीनमध्ये 13.7 मीटर रुंदी असलेला बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. हा 16.62 किलोमीटर लांबीचा बोगदा यांगझी नदीखालून जातो. शांघाय शहराला चीनमधील चांगक्सिंग बेटाला जोडणारा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे ज्याची रुंदी 13.7 मीटर आहे.

मात्र लवकरच हा किताब भारताकडे येणार आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर दोन बोगदे बांधले जात आहेत. यापैकी एका टनलची लांबी 1.75 किमी आणि दुसऱ्या टनलची लांबी 8.92 किमी आहे. या दोन्ही टनलची रुंदी 23 मीटरपेक्षा जास्त आहे. 23.75 मीटर रुंदीचे दोन्ही बोगदे जगातील सर्वात मोठे बोगदे आहेत.

या बोगद्याला 4 लेन असतील. हा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे 500 – 600 फूट उंचीवर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा तयार केला जात आहे. त्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दोन्ही बोगद्यांचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं आहे.

जगातील सर्वात रुंद बोगदा..

6,695 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या बोगद्यांचे काम पूर्ण होत आहे. हा बोगदा खास आहे, कारण हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. हा बोगदा सुरू झाल्यानंतर मुंबई – पुणे हे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. एक्सप्रेस – वे वरील खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किमीवरून 13.3 किमी इतके कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवासात सुमारे अर्धा तासाची बचत होणार आहे.

वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघात कमी होतील. बोगद्याच्या आत दगड पडू नयेत यासाठी रॉक बोल्ट लावण्यात आले आहेत. प्रत्येक 300 मीटरवर एक्झिट पॉइंट बनवण्यात आले आहेत. आग रोखण्यासाठी हाय प्रेशर वॉटर मिक्स सिस्टीम बसवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *