ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता केंद्र व राज्य शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातर्फे सन 2023-24 या वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येते.
या योजनेअंतर्गत पिठाची गिरणी, शिलाई मशीन, दाल मिल, मसाला उद्योग मशीन अशा अनेक प्रकारच्या योजनांमुळे खास महिलांकरिता राबविण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेसाठी 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. (ZP Scheme 2023)
या योजनांच्या लाभामुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावतो. तसेच त्यांना वैयक्तिक कमाईचे साधन मिळते. मागील 5 वर्षांत लाभ घेतला नसल्यास लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत. एका योजनेसाठी एका लाभार्थ्यास एकच अर्ज सादर करता येणार आहे.
या 4 लाभांसाठी 90 टक्के अनुदान..
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना पिठाची चक्की घेण्यासाठी 90 टक्के अनुदान..
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींना शिलाई मशिन घेण्यासाठी 90 टक्के अनुदान..
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मिनी दाल मिल घेण्यासाठी 90 टक्के अनुदान..
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मसाला उद्योग मशीन घेण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे .
आवश्यक कागदपत्रे :-
1. अर्जदार महिला 12 वी पास असावी. (12 वी )
2. आधार कार्ड
3. 8अ उतारा(घराचा)
4. विहित नमुन्यातील अर्ज
5. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा
6. बँक पासबुक
7. विज बिल
वरील कागदपत्रे जोडून आपण फ्री पिठाची गिरणी योजना(Free flour mill Scheme) अंतर्गत अर्ज करू शकतो.
अर्ज डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा
सदर योजनांचे अर्ज आणि संबंधित अटी व शर्ती तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण, तसेच बेबसाईटवर उपलब्ध आहे. तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महिला व बालविकास विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यंडोले यांनी केले आहे.
ज्या जिल्हा परिषदेसाठी महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिलांनी आपल्या तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला भेट द्यावी.