केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट..! प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये जमा, वेतनातही मोठी वाढ, चेक करा डिटेल्स..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीनिमित्त सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारने विशेष फेस्टिव्हल अँडव्हान्स योजना देण्याची घोषणा केली आहे. या फेस्टिव्हल अँडव्हान्स योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे कर्मचारी होळीच्या दिवसापासून 10,000 रुपये अँडव्हान्स घेऊ शकतात आणि त्यावर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. ते पैसे 31 मार्चपर्यंत कधीही खर्च करता येणार आहे.
अकाउंटमध्ये क्रेडिट होणार पैसे..
अर्थ मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांना दरवर्षी हे गिफ्ट मिळतं. दिला जाणारा अँडव्हान्स प्री लोडेड आहे. हे पैसे आधीच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवले आहे, फक्त त्यांना फक्त खर्च करावे लागणार आहे. चांगली बाब म्हणजे या अँडव्हान्स रकमेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. तसेच त्याची परतफेड करण्याच्या अटीही अतिशय सोप्या आहेत. 1000 रुपयांच्या हप्त्यांसह, 10 हप्त्यांमध्ये पैसे परत करण्याची सूट आहे.
पैसे डिजिटल पद्धतीने खर्च करावे लागणार खर्च..
फेस्टिव्हल अँडव्हान्स स्कीम अंतर्गत सुमारे 4000 – 5000 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आगाऊ योजनेचे बँक शुल्कही सरकार उचलते. कर्मचारी ही अँडव्हान्स आगाऊ रक्कम फक्त डिजिटल पद्धतीने खर्च करू शकतात. यापूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एलटीसी कॅश व्हाउचर योजनेसारख्या सुविधाही दिल्या आहेत.
LTC मध्ये काय फायदा आहे ?
सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रवास भत्ता रजा योजनेत कॅश व्हाउचर योजना (LTC Cash Voucher Scheme) जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत कर्मचार्यांना प्रवास भत्त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या रोख रक्कमेचे बाजारात सर्कुलेशन केलं जाईल.
मार्चमध्ये मिळणार वाढीव DA चा लाभ..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्याचा डीए 4% ने वाढवला आहे. किमान मूळ वेतन 18,000 रुपये दरमहा एकूण 720 रुपयांनी वाढलं आहे. तसेच 250000 रुपयांची कमाल वेतन 12000 रुपयांनी वाढणार आहे.