केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA)आता वाढला आहे. 4 टक्क्यांच्या वाढीसह त्यांचा महागाई भत्ता आता 38% होणार आहे. आता 18 महिन्यांची महागाई भत्त्याची (DA Hike) थकबाकीही मिळणे अपेक्षित आहे. परंतु, 2020 मधील रोखलेल्या DA थकबाकीवर सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेलं नाही.
कर्मचारी संघटना आणि जेसीएम (JCM) च्या राष्ट्रीय परिषदेचे म्हणणं आहे की, त्यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे. त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि पेन्शनधारकांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतु, त्यावर तोडगा निघालेला नाही. गेल्या महिन्यात जेसीएमने JCM कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करण्याचे आवाहन केलं आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे पैसे रोखता येणार नाहीत, अशी सुप्रीम कोर्टाची टिप्पणी उद्धृत करण्यात आली आहे.
नोव्हेंबर च्या बैठकीत घेतला जाऊ शकतो निर्णय :-
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत बंद करण्यात आला होता. परंतु, जुलै 2021 पासून तो एकाच वेळी वाढविण्यात आला. परंतु, रोखलेल्या कालावधीचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. आता कर्मचारी त्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. DA जाहीर झाल्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना सातत्याने थकबाकीची मागणी करत आहेत.
निवृत्ती वेतनधारकांनीही डीआरच्या (DR) थकबाकीबाबत पंतप्रधान मोदींकडे दाद मागितली आहे. दीड वर्षाच्या थकबाकी (18 Months DA Arrear) बाबत सरकारशी बोलणी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. सरकार इच्छित असल्यास वाटाघाटीद्वारे तोडगा (Negotiated Settlement) काढू शकते, असे जेसीएम सचिवांनी म्हटले आहे. याबाबत नोव्हेंबरमध्ये कॅबिनेट सचिवांसोबत बैठक होणार आहे. त्यामुळे दिवाळी आधी कर्मचाऱ्यांना पुन्हा एक गुड न्यूज मिळती का ? याची वाट पाहावी लागणार आहे.
जर DA थकबाकी आली तर तुम्हाला किती पैसे मिळतील ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची DA ची थकबाकी मिळाल्यास मोठा फायदा होणार आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम (Staff side) च्या शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, लेव्हल-1 कर्मचाऱ्यांची थकबाकी रु. 11,880 ते रु. 37,554 पर्यंत आहे. तसेच, जर लेव्हल-13 (7वी CPC बेसिक पे स्केल रु 1,23,100 ते रु 2,15,900) किंवा लेव्हल-14 (वेतन स्केल) साठी कॅल्क्युलेशन केलं तर DA ची थकबाकी रु. 1,44,200 ते रु 2,18,200 होईल.
Pay-grade नुसार किती मिळतील पैसे ?
केंद्रीय कर्मचारी (Central Staff) ज्यांचे किमान ग्रेड वेतन 1800 रुपये आहे (लेव्हल-1 बेसिक पे स्केल रेंज 18000 ते 56900) ला 4320 रुपये {18000 च्या 4 टक्के X 6} मिळतील. तर, [{4 टक्के 56900}X6] असलेल्यांना 13,656 रुपये मिळतील.
किमान ग्रेड वेतनावर (Pay grade for CG employees) केंद्रीय कर्मचार्यांना जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत 3,240 रुपये [{18,000}3%}x6] DA थकबाकी मिळेल. तर, [{56,9003} 3%}x6] असलेल्यांना 10,242 रुपये मिळतील. तर, जानेवारी ते जुलै 2021 मधील DA देय [{18,000}4%}x6] 4,320 रुपये असेल. तसेच, [{56,9003} 4%}x6] 13,656 रुपये मिळतील.
DA थकबाकी रुपये 4320+3240+4320 असेल देय :-
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन मॅट्रिक्सनुसार किमान वेतन 18000 रुपये आहे, DA Arrear नुसार, 11,880 रुपये मिळेल. यामध्ये जानेवारी 2020 चे रु. 4320 + जून 2020 चे रु. 3240 + जानेवारी 2021 चे रु. 4320 चा समावेश असणार आहे.