देशातील सर्वात स्वस्त Electric car लॉन्च होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना देशातली दिग्गज कंपनी Tata Motors गुड न्यूज दिली आहे. Tata Motors ने आज आज Tiago EV भारतात 8.49 लाख रुपयांच्या (Ex-showroom) किमतीत लॉन्च केली आहे.

या किमतीत लॉन्च होणारी Tiago EV ही देशातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे.Tiago EV दोन बॅटरी पॅक ऑपशन सह एकूण 7 व्हेरियंट मध्ये ऑफर केली जाते, ज्याच्या किंमती 8.49 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 11.79 लाख रुपये (Ex-showroom) पर्यंत जाते.

विशेष म्हणजे,Tiago EV च्या किमती सुरुवातीला फक्त 10,000 युनिट्सचे बुकिंग होईपर्यंत लागू राहतील. कंपनी 10 ऑक्टोबरपासून कस्टमर्ससाठी बुकिंग विंडो ओपन झाली आहे, तसेच डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने सध्याच्या टाटा इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी 10,000 युनिट्सपैकी 2,000 युनिट्ससाठी बुकिंग रेजर्व केले आहे.

मोठ्या बॅटरीसह जबरदस्त रेंज :-

Tata Tiago EV दोन बॅटरी पॅक ऑपशनसह लॉन्च करण्यात आली आहे, 19.2 kWh आणि 24 kWh. कंपनीने Tiago EV च्या बेस व्हेरियंटमध्ये 19.2 kWh बॅटरी पॅक वापरला आहे, तर टॉप व्हेरियंटमध्ये 24 kWh बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. कंपनीने वेगवेगळ्या कस्टमर्सच्या गरजा लक्षात घेऊन दोन्ही बॅटरी पॅक मॉडेल लॉन्च केले आहेत.

रेंजबद्दल बोलायच म्हटलं तर, 24 kWh बॅटरी पॅक मॉडेलची रेंज 315Km आहे, तर 19.2 kWh बॅटरी पॅक मॉडेल कमाल 250Km ची रेंज देण्यास सक्षम आहे.आत्तापर्यंत, या कॅटेगरी टेस्ट डेटानुसार आहेत, परंतु कॅटेगरी च्या रेंज मध्ये चेंज होऊ शकतो.

Tata Tiago EV Price
Battery Pack Charging Option Variant Price
19.2 kWh 3.3 kW AC XT ₹8.49 Lakh
XT ₹9.09 Lakh
24 kWh 3.3 kW AC XT ₹9.99 Lakh
XZ+ ₹10.79 Lakh
XZ+ Tech LUX ₹11.29 Lakh
7.2 kW AC XZ+ ₹11.29 Lakh
XZ+ Tech LUX ₹11.79 Lakh

 

कंपनीने Tata Tiago EV मध्ये तिचे लेटेस्ट Ziptron टेक्नॉलॉजी वापरली आहे. यामध्ये कंपनीने Tigor EV आणि Nexon EV सारख्या पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. त्याच्या पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरमुळे, Tiago EV फक्त 5.7 सेकंदात 0-60Km/h वेग वाढवू शकते.

मिनिटांत होईल फुल चार्ज :-

Tata Tiago EV मध्ये, कंपनीने नॉर्मल चार्जिंगसह फास्ट चार्जिंगचा ऑप्शन देखील दिला आहे. DC फास्ट चार्जरच्या साहाय्याने केवळ 57 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज करता येते. कंपनी कारसोबत 3.3kWh AC चार्जर स्टॅंडर्ड म्हणून देत आहे, तर 7.2kWh AC होम फास्ट चार्जर ऑप्शन म्हणून उपलब्ध आहे. कंपनी बॅटरी आणि मोटरवर 8 वर्षे /1,60,000 किमीची वॉरंटी देत ​​आहे.

डिझाइन पेट्रोल मॉडेलसारखं पण लूक प्रीमियम :-

Tata Tiago EV चे डिझाईन पेट्रोल मॉडेल सारखेच आहे, जरी इलेक्ट्रिक मॉडेलला समोरच्या ग्रिलवर ‘EV’ बॅज आणि कारच्या बाहेरील बाजूस ब्ल्यू एक्सेंट मिळतो. Tata Tiago EV चे व्हील कॅप डिझाइन देखील वेगळे आहे. टील ब्लू,डेटोना ग्रे, प्रिस्टाइन व्हाइट, मिडनाईट प्लम आणि ट्रॉपिकल मिस्ट या पाच कलर ऑप्शनमध्ये संपूर्ण शोरूममध्ये उपलब्ध असणार आहे.

इंटीरियर फीचर्स :-

इंटीरियरबद्दल बोलायचे झालं तर, याच्या केबिनचे डिझाईन पेट्रोल मॉडेलप्रमाणेच करण्यात आली आहे. Tigor EV प्रमाणे, टाटा ने Tiago EV मध्ये ब्ल्यू एक्सेंट, लेदरेट स्टीयरिंग व्हील आणि सीट वापरले आहेत. गियर लीव्हर रोटरी डायलने बदलले गेले आहे आणि त्यात स्पोर्ट्स मोड आहे. विशेष म्हणजे, Tiago EV मध्ये स्पेअर व्हील नाही, पण पंक्चर रिपेअर किट मिळते. बॅटरी पॅक बूटमध्ये ठेवल्याने स्पेअर व्हील काढून टाकण्यात आलं आहे.

Tiago EV मध्ये मिळणाऱ्या इक्विपमेंट्स बाबतीत, Tiago EV ZConnect अँप, हिल स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, TPMS, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, पुश बटन स्टार्ट / स्टॉप आणि क्रूझ कंट्रोल यासारख्या 45 कनेक्टेड कार फीचर्ससह येते. यात मल्टी-मोड री-जनरेशन देखील मिळते, जे Nexon EV Max मध्ये देखील उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *