Tata Tiago EV, XUV400 नंतर भारतीय बाजारपेठेत आणखी एक न्यू इलेक्ट्रिक कार (EV) दाखल होणार आहे. फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएन (Citroën) आपली पहिली इलेक्ट्रिक कार आज 29 सप्टेंबर रोजी बाजारात आणणार आहे.

कंपनीने सोशल नेटवर्किंग साइट ट्विटवर आपल्या इलेक्ट्रिक कारचा एक छोटा टीझर देखील जारी केला आहे, या टीझरमध्ये कारच्या नावाबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नसली तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, ही इलेक्ट्रिक कार असून सध्याच्या स्वस्त मॉडेल Citroen C3 चे न्यू इलेक्ट्रिक व्हर्जन असणार आहे. ही इलेक्ट्रिक कार 29 सप्टेंबरला लॉन्च होणार असल्याची घोषणा टीझरमध्ये करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीमुळे, ऑटोमेकर्स कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची स्पर्धा लागली आहे. भारतीय बाजारपेठेसाठी सिट्रोएन (Citroën) हे या विभागातील नवं नाव आहे. याआधी, फ्रेंच कार कंपनीच्या Citroen C3 चे इलेक्ट्रिक व्हर्जन टेस्टिंग दरम्यान दिसलं होतं, ज्याच्या समोरच्या बोनेटवर चार्जिंग पोर्ट होता. या इलेक्ट्रिक कारचे फोटो इंटरनेटवर येताच लॉन्चच्या बातम्या येऊ लागल्या आणि अखेर आज कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे.

परफॉर्मेंस आणि ड्रायव्हिंग रेंज :-

त्याच्या ICE मॉडेलप्रमाणे, Citroen C3 EV देखील त्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, त्यामुळे एक्स्टेरियरमध्ये फारसा बदल अपेक्षित केला नाही. हे एकाधिक बॅटरी ऑप्शनसह ऑफर केले जाऊ शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी याला 50W बॅटरी पॅकसह देऊ शकते, जो जागतिक बाजारात विकल्या जाणार्‍या Peugeot e-208 मध्ये दिसत आहे. या बॅटरीची WLTP- स्टॅंडर्ड रेंज 350 Km आहे. असे मानले जातं की, या कारमध्ये दिलेली इलेक्ट्रिक मोटर 135 Bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

याशिवाय, ही कार एका स्मॉल बॅटरी पॅकसह देखील दिली जाऊ शकते, जी 300 Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल. स्मॉल बॅटरी पॅक असल्याने, हे व्हेरियंटही स्वस्त असू शकतं. याशिवाय यामध्ये काही फीचर्सही कमी करता येऊ शकतात. मात्र, त्याबाबत अधिक माहिती कारच्या लॉन्चच्या वेळीच उपलब्ध होईल. या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, रिअर डिफॉगर, रिअर वायपर, मॅन्युअल अँडजस्टमेंटसह ORVM, रिजन ब्रेकिंग, मल्टिपल ड्राईव्ह मोड इत्यादी फीचर्स दिले जाऊ शकतात.

किती असू शकते किंमत…

लॉन्चपूर्वी नवीन Citroen C3 EV च्या किंमतीबद्दल तज्ञांचे मत आहे की, कंपनी ही कार 9 ते 14 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च करू शकते. बाजारात आल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार प्रामुख्याने टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक, Tata Tiago EV, आणि महिंद्राच्या आगामी इलेक्ट्रिक SUV XUV400 शी थेट स्पर्धा करेल. आता कंपनी त्याची किंमत काय ठरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *