राज्यातल्या 7675 ग्रामपंचायत निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ; पहा, तुमच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
शेतीशिवार टीम : 29 सप्टेंबर 2022 :- राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 34 जिल्ह्यांतील 7649 ग्रामपंचायती, नवनिर्मित 8, तसेच गेल्या निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7675 निवडणुकांबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
आता या सर्व निवडणुका पुढे ढकलल्या असून या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित विभागला दिले आहे.
मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त असतं. ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर प्रत्यक्ष निवडणूक घेण्यासाठी 2-3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. तसेच नव्या प्रभाग रचनेप्रमाणे मतदार याद्या तयार कराव्या लागतात. या सर्व निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येतं असतं.
त्यामुळं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस – जश्या संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पत्रक काढून ग्रामविकास विभागाल प्रशासक नेमण्याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता दिवाळीचे फटाके वाजल्यानंतर गावकीच्या कारभारावर मांड ठोकण्यासाठी प्रचाराचे फटाके वाजवणाऱ्यांना अजून कमीत कमी अजून 5-6 महिने लागण्याची शक्यता आहे.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतची निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत दर पाच वर्षांनी घेण्यात येते. मुदत संपण्याच्या कालावधी आधी या निवडणुकीची प्रक्रिया संपन्न होत असते.
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2022 मध्ये पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार साधारणतः नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर वाजण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु राज्य सरकारने या निवडणुका घेण्यास नकार दिल्याने निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले आहे.
राज्य व केंद्र सरकारच्या विविध विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना गाव कारभारी म्हणून पाहिले जाते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमात सुधारणा करीत थेट जनतेतून सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली.
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच थेट जनतेतून निवडण्यात आले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले.
महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सदस्यातून सरपंच निवडणूक घेण्याचे निर्देश जारी केले. या निर्णयानुसार जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतीची निवडणूक आणि सरपंच प्रक्रिया पार पडली.
दरम्यानच्या काळात राज्यातील सत्तेत पुन्हा सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुन्हा जनमतातून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.
पहा, अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायती :-
अकोले – 11
नेवासे – 13
जामखेड – 2
नगर -28
राहाता -12
पारनेर -16
राहुरी – 11
श्रीगोंदा- 10
श्रीरामपूर- 6
शेवगाव -12
पाथर्डी – 11
संगमनेर 38 + 2
कर्जत – 8
कोपरगाव – 26
पहा, जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या :-