Take a fresh look at your lifestyle.

पुणे – बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग : भूसंपादनाला सुरुवात तर झाली पण, मोबदला किती पट मिळणार? पहा, जमिनीनुसार तुमच्या गावातील रेडी रेकनर रेट

2

Ready Reckoner Rate Maharashtra : स्थावर मालमत्तेचा किंवा कोणत्याही जमिनीचा सरकारी दर सर्व राज्य सरकारे ठरवतात. त्यानुसार मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्क (Registration Charge) भरावे लागते. वेगवेगळ्या राज्यात याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. महाराष्ट्रात त्याला रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate) असं म्हणतात. राज्यातील महसूल विभागाने रेडी रेकनर दर ऑनलाइन पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण बहुतेकांना त्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे जमीन खरेदी – विक्री करताना त्यांना फसवेगिरीला सामोरं जावं लागतं.

तसेच राज्यात अनेक महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरु आहे. या भूसंपादनाच्या ज्या जमीनदारांची / शेतकऱ्यांची जमीन जात आहे त्यांना त्या जागेच्या रेडी रेकनर दरानुसार 5 ते 12 पट मोबदला दिला जातो? आता हा रेट ठरतो त्या ठिकाणच्या जमिनीनुसार.  परंतु बऱ्याच जणांना आपल्या जमिनीचं मूल्य किती ? ते कुठे पाहायचं ? हे माहिती नसतं…       

तुम्ही महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर कोणत्याही शुल्काशिवाय रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate) सहजपणे शोधू शकता. रेडी रेकनर दर म्हणजे काय ? आणि तो ऑनलाइन कसा पाहायचा ? याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ही खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा…चला तर मग जाणून घेऊया की रेडी रेकनर दर म्हणजे नेमकं काय आहे ? 

रेडी रेकनर दर म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्य सरकारने निश्चित केलेल्या स्थावर मालमत्तेचे किमान मूल्य म्हणजे रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate). त्यानुसार सरकारला मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्क (Registration Charge) भरावे लागते. मुद्रांक शुल्क यांची गणना रेडी रेकनर दर किंवा व्यवहाराच्या वास्तविक मूल्यावर यापैकी जे जास्त असेल त्यावर केली जाते.

ही मालमत्ता निवासी किंवा व्यावसायिक असू शकते. स्थावर मालमत्तेचे योग्य मूल्यमापन सुनिश्चित करण्यासाठी, सर्व राज्य सरकारे वार्षिक रेडी रेकनर दर प्रकाशित करतात. त्यानुसार हे सर्कल दर राज्यानुसार, शहर आणि परिसरात बदलू शकतात.

1) उदाहरणार्थ :-

एखाद्या परिसरात मालमत्ता खरेदी करण्यासाठी रेडी रेकनर दर 5,000 रुपये प्रति चौरस फूट निश्चित केला आहे आणि त्या मालमत्तेचे बाजार मूल्य 6,000 रुपये प्रति चौरस फूट आहे, तर मालमत्ता खरेदी करणाऱ्याला 6,000 रु. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागेल.

2) उदाहरणार्थ :-

जर तुम्हाला एखाद्या परिसरात बंगला घ्यायचा असेल अन् त्या बंगल्याचे मूल्य 50 लाख रुपये असेल. तर 5% मुद्रांक शुल्क 2.5 लाख रुपये एवढे होईल. एखाद्या फ्लॅटची मूळ खरेदी किंमत 70 लाख रुपये असल्यास, तुम्हाला 3.5 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

टीप :- महाराष्टातील शहरांत फ्लॅटसारखी मालमत्ता खरेदी करण्यासाठी 5% मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आहे.

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, आपण महाराष्ट्रात रेडी रेकनर दर कसा पाहायचा ? त्यामुळे यासाठी महसूल विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिथे महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही क्षेत्राचा रेडी रेकनर दर पाहू शकते. येथे आपण तो ऑनलाइन कसा पाहायचा ते सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया….

महाराष्ट्राचा रेडी रेकनर दर ऑनलाइन कसा पाहाल ?

रेडी रेकनर दर ऑनलाइन पाहण्यासाठी सुविधा महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या (Revenue Department) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. हे पाहण्या साठी, सर्वप्रथम कोणतेही इंटरनेट वेब ब्राउझर उघडा. यानंतर igrmaharashtra.gov.in ही वेबसाइट उघडा. तुमच्या सोयीसाठी, आम्ही या वेबसाइटची थेट लिंक येथे देत आहोत, जेणेकरून तुम्ही थेट वेब पोर्टलवर जाऊ शकता – इथे क्लिक करा

igr maharashtra ची अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रीनवर नकाशा दिसेल. यामध्ये महाराष्ट्रातील तो जिल्हा निवडा ज्या जिल्ह्याचा तुम्हाला रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate) पाहायचा आहे. उदाहरणार्थ – औरंगाबाद.

आता सर्वात आधी वर्ष निवडा. जसे – 2021 – 2022 नंतर तालुका (Taluka) निवडा. यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडा. सर्व डिटेल्स निवडताच, रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate) तुमच्या स्क्रीनवर उघडेल. तुम्ही तो पाहू शकता…

2 Comments
  1. […] शासनाने निश्चित केलेलं तुमच्या जमिनीचा रेडी रेकनर रेट ऑनलाईन फक्त 2 चं मिनिटात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा […]

Leave A Reply

Your email address will not be published.