भारतात लॉन्च होणार आगळी-वेगळी Oli इलेक्ट्रिक कार ; रेंज 400Km, टॉप स्पीड 110Km/h, हा Horror लूक पाहून दिवाने व्हाल !
फ्रेंच ऑटोमेकर कंपनी Citroen ने ऑल-न्यू Oli कॉन्सेप्ट मॉडेलचे अनावरण केलं आहे. आकर्षक डिझाईन, एक्स्टेरिअर आणि इंटेरिअर अशा दोन्ही पार्ट मध्ये डेकोरेट केलेली ही इलेक्ट्रिक कार अनेक अर्थांनी खास आहे. कंपनीचे म्हणणं आहे की, या कारचे वजन हलके ठेवून, अधिक चांगल्या रेंजसह किफायतशीर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. Citroen ने या Oli चे वर्णन केलं आहे. ही इलेक्ट्रिक कारचं नाही तर मल्टी पर्पज इलेक्ट्रिक डिव्हाईस आहे. त्याची लांबी 4.2 मीटर, उंची 1.65 मीटर आणि रुंदी फक्त 1.90 मीटर आहे.
या कारच्या अँक्सटीरियरबद्दल बोलायचं झालं तर फ्लॅट बोनेट, रूफ आणि हेडलॅम्प्स आणि टेल-लॅम्प्सना आकर्षक डिझाइन देण्यात आलं आहे. कंपनीचे म्हणणं आहे की, त्याच्या प्रॉडक्शन आणि व्हर्जनचे वजन सुमारे एक टन असेल आणि एका चार्जवर ही कार 400 Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल. यामध्ये कंपनी 40 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरणार असून त्याचा टॉप स्पीड 110Km/h असणार आहे. इतकंच नाही तर, या कारची बॅटरी फास्ट चार्जिंग सिस्टीमने अवघ्या 23 मिनिटांत 20 ते 80% चार्ज होऊ शकते.
3 डोअरच्या या कारचे केबिन रेड कलर थीमने सजवण्यात आलं आहे, रेड कलर्स सीट्स आणि अँम्बीएंट लाइटिंगने ही कार आणखीनच आकर्षक बनली आहे. ही कार दिसायला छोटी असली तरी ती अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की, ती अनेक प्रौढांचे वजन सहज उचलू शकते. कारच्या बॅक साईडला असलेला पिक-अप बेड, जो ऑलीला स्पेसिफिक सिल्हूट देखील देतो, तसेच लोड पॅनेलपेक्षा ज्यादा कार्गो स्पेस देतो.
या कारचे आणखी एक फीचर्स म्हणजे त्याचे फ्रंट आणि बॅक बंपर आणि व्हील आर्च 50% रीसाइकिल प्लॅस्टिकपासून बनविल्या गेल्या आहेत आणि त्या 100% स्वतःहून रीसाइकिल करण्यायोग्य आहेत.
त्याचे टायर्स सुप्रसिद्ध कंपनी गुडइयर सोबत विकसित केले आहेत, ज्यामध्ये सिंथेटिक ऐवजी सूर्यफूल तेल, पाइन ट्री रेजिन्स आणि सर्व-नैसर्गिक रबर यासारख्या टिकाऊ साहित्याचा वापर केला जातो. Citroen चा नवीन शेवरॉन लोगोही ओली संकल्पनेत देण्यात आला आहे.
12 तास देणार पॉवर :-
ही इलेक्ट्रिक कार केवळ बॅटरीवर चालणार नाही तर, इतर इलेक्ट्रिक उपकरणांनाही चालवण्याची क्षमता यात आहे. Oli व्हीकल -टू-ग्रिड (V2G) आणि व्हीकल -टू-लोड (V2L) सिस्टिम्सना देखील समर्थन देते. याचा अर्थ असा की, वीज खंडित झाल्यास Oli चा यूज बॅकअप उर्जा स्त्रोत म्हणून देखील केला जाऊ शकतो. याचे पॉवर सॉकेट आउटपुट 3.6kW आहे, त्यामुळे ते थेरॉटिकली 3000w इलेक्ट्रिक डिव्हाइसला सुमारे 12 तास पॉवर देऊ शकते. कंपनीने अद्याप त्याचे प्रॉडक्ट मॉडेल कधी लॉन्च केलं जाईल याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.