महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनापोटी राज्य सरकारने 200 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. कोरोना काळात तर एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता मार्च 2020 मार्च 2021 या काळात एसटीचे 6 हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न बुडाले.

निधी नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर झाले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतून एसटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी निधी द्यावा लागत आहे. राज्य सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात 1 हजार 450 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली.

यापूर्वी एप्रिल महिन्यात 300 कोटी रुपये, तर जून महिन्यात 360 कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर दर महिन्याचा पगार देण्यासाठी राज्य राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे.

200 कोटींचा निधी अपुरा..

महामंडळाने 200 कोटींचा निधी जरी मंजूर केला असला तरी हा निधी अपर असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कर्मचा-यांचे दर महिन्याचे वेतन देण्यासाठी 360 कोटी रुपयांची गरज आहे त्याबाबतीत एसटी महामंडळाने मागील थकबाकी आणि ऑक्टोबरच्या वेतनासाठी सरकारकडे 790 कोटी रुपयांची मागणी निवेदनाद्वारे केली होती.

परंतु सरकारने म्हणणं न ऐकताच फक्त 200 कोटी रुपये दिल्याने ही रक्कम कोणाकोणाला वाटायची हा प्रश्न महावितरणला पडला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *