केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या पगारात वाढ सुरू झाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना अलीकडेच महागाई भत्त्यात वाढीची भेट मिळाली आहे. सणासुदीचा काळ त्यांच्यासाठी चांगला जाणार आहे. बोनस, महागाई भत्ता, थकबाकी या सर्व गोष्टी दिवाळीपूर्वी मिळत आहेत. पण, येणारे वर्ष याहून अधिक फायदेशीर ठरणार आहे.
सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांचा महागाई भत्ता (DA) 46 टक्के केला आहे. 1 जुलैपासून लागू होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने इतर भत्त्यांमध्येही वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक, DA वाढीनंतर, पुढील सुधारणा HRA (घर भाडे भत्ता) ची आहे. पण, हे रिव्हिजन कधी होणार आणि किती होणार ? जाणून घेउया..
DA वाढीनंतर आता HRA रिव्हिजनची वेळ..
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हे प्रमाण 46 % करण्यात आले आहे. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता 25 टक्क्यांच्या पुढे गेल्यावर HRA मध्ये 3 टक्क्यांनी शेवटची सुधारणा केली होती. त्यावेळी वरची मर्यादा 24 टक्क्यांवरून 27 टक्के करण्यात आली होती. पण, आता पुन्हा एकदा त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. सातत्याने वाढणाऱ्या DA नंतर HRA ची पुढील सुधारणा कधी होणार हा प्रश्न आहे.
HRA त किती होणार वाढ ? शासनाने आधीचं केलं कन्फर्म..
कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) नुसार, केंद्रीय कर्मचार्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) मध्ये सुधारणा महागाई भत्त्याच्या आधारावर केली जाते. घरभाडे भत्ता (HRA) च्या श्रेणी X, Y आणि Z वर्ग शहरांनुसार आहेत. शहरांच्या श्रेणीनुसार सध्याचे दर 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के आहेत. ही वाढ DA सोबत 1 जुलै 2021 पासून लागू आहे. परंतु, 2016 मध्ये सरकारने जारी केलेल्या ज्ञापनानुसार, DA वाढीसह HRA वेळोवेळी सुधारित केले जाईल. आता पुढील रिव्हिजन वर्ष 2024 मध्ये होणार आहे आणि ती अपेक्षेप्रमाणे सुरुवातीच्या काही महिन्यांतच वाढेल..
HRA 3 टक्क्यांनी वाढणार..
घरभाडे भत्त्यात पुढील सुधारणा 3% असेल. HRA चा कमाल दर सध्याच्या 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढेल. पण, हे तेव्हा होईल जेव्हा महागाई भत्ता 50% च्या वर जाईल. जानेवारी 2024 मध्ये हे घडण्याची शक्यता आहे. एकदा का DA 50% ओलांडला की, HRA 30%, 20% आणि 10% वर सुधारला जाईल. X श्रेणीत येणार्या केंद्रीय कर्मचार्यांना 27 टक्के HRA मिळत आहे, जो DA 50% असल्यास 30% होईल. त्याच वेळी, Y वर्ग लोकांसाठी ते 18 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढेल. झेड वर्गातील लोकांसाठी ते 9 टक्क्यांवरून 10 टक्के होईल..
जर DA शून्य झाला तर HRA मध्ये झाली घट..
जेव्हा 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला तेव्हा HRA 30, 20 आणि 10 टक्क्यांवरून 24, 18 आणि 9 टक्के करण्यात आला. तसेच त्याच्या 3 श्रेणी X, Y आणि Z तयार करण्यात आल्या. त्या काळात DA शून्य करण्यात आला. त्या वेळी, DoPT च्या अधिसूचनेमध्ये असे नमूद केले होते की, जेव्हा DA 25 टक्क्यांचा आकडा ओलांडतो तेव्हा HRA स्वतःच 27 टक्क्यांपर्यंत सुधारित केला जाईल आणि जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तेव्हा HRA देखील 30 टक्क्यांपर्यंत सुधारित केला जाईल.
कसा डिव्हाईज होणार HRA ?
50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे X श्रेणीत येतात. या शहरांमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27 टक्के HRA मिळेल. तर Y श्रेणीतील शहरांमध्ये हे प्रमाण 18 टक्के आणि Z श्रेणीत 9 टक्के असेल..