Take a fresh look at your lifestyle.

बेरोजगारांसाठी खुशखबर | दुग्ध व्यवसाय, शेळी, मत्स, कुक्कुटपालणासाठी 10 दिवसांचं प्रशिक्षण…

0

शेतीशिवार टीम, 15 मार्च 2022 : ग्रामीण तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार हा उत्पन्नाचा सशक्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या अग्रगण्य राष्ट्रीयीकृत बँकेने, डिसेंबर 2001 मध्ये महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची (MRSETI) स्थापना हडपसर, पुणे येथे केली. युवकांकडुन मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे MRSETI ला आपला विस्तार वाढवावा लागला आणि पुण्यानंतर औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती, जालना व ठाणे येथे प्रशिक्षण केंद्रे स्थापन करावी लागली. पुणे केंद्रामार्फत 2021 पर्यंत 347 प्रशिक्षण कार्यक्रम झाले असुन त्यामार्फत 8171 बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण दिले आहे. 8171 पैकी 6086 युवक / युवतींनी स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सुरु केला आहे.

संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सुरु केला आहे. संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्याची यशाची टक्केवारी 74.78 % इतकी आहे ग्रामीण उद्योजकतेचा विकास करणे तसेच रोजगारनिर्मिती आणि दारिद्र्य निर्मुलन हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून त्यासाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्न करते. संस्थेमार्फत प्राधान्याने तांत्रिक स्वरुपाचे उद्योजकीय विकास कार्यक्रम आखले जातात.

उदा.मोबाईल दुरुस्ती, दुचाकी वाहन दुरुस्ती, फोटोग्राफी, मोटार रिवाईडिंग, टेलरिंग, ब्युटी पार्लर, कागदी पिशव्या व फाईल्स बनविणे, सीसीटिव्ही कॅमेरा बसविणे व दुरुस्ती तसेच शेतीवर आधारित दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मत्सपालन, कुक्कुटपालन, पॉलिहाऊस व शेडनेट इत्यादी. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार MESETI च्या सातही केंद्राना RSETI म्हणून मान्यता मिळाली असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा (PMEGP) साठी प्रशिक्षण देणारी अधिकृत संस्था आहे.

उमेदवार उपलब्ध झाल्यास स्थानिक पातळीवर देखील प्रशिक्षणाचे आयोजन संस्थेमार्फत केले जाते . विषयाचे सखोल ज्ञान , भरपूर सराव आणि प्रात्यक्षिके तसेच प्रशिक्षणानंतर दोन वर्षे उमेदवाराचा पाठपुरावा करून त्याच्या यशस्वीतेसाठी संस्था सर्वतोपरी मदत करते.

प्रशिक्षणा दरम्यान बँक कर्ज प्रस्ताव तसेच शासकीय अनुदान योजना आर्थिक साक्षरता आणि मार्केटिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण कार्यक्रम तसेच मुलाखतीच्या तारखा पूर्वनियोजित असून त्याची प्रसिद्धी बँकेच्या शाखांमार्फत व शासकीय कार्यालयातून केली जाते. प्रशिक्षण निवासी स्वरुपाचे असून पूर्णपणे मोफत आहे.

संस्थेचा मुख्य उद्देश :-

ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगार तरुणांना निवडून स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन करणे.
ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय विकसित करण्यासाठी प्रयत्न
ग्रामीण भागातील विकासाला चालना देणाऱ्या संस्था प्रतिनिर्धीना प्रशिक्षण व मार्गदर्शन, ग्रामीण भागात स्वयंसहायता गट वाढीसाठी मार्गदर्शन

संस्थेची वैशिष्ट्ये :-

संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य
निवासाची व्यवस्था विनामूल्य
नाष्टा, चहा, भोजन विनामूल्य
उत्तम व अनुभवी प्रशिक्षण
योग प्रशिक्षण
भरपूर प्रात्यक्षिके व सराव
उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण
बैंक कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन

1) मुलाखत दिनांक 21 मार्च 2022
2) मुलाखतीची वेळ सकाळी 10 ते 5
3 ) प्रशिक्षण कालावधी 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2022
4 ) प्रशिक्षणाची वेळ – सकाळी 9.50 ते सायं 5.30
5) वयोमर्यादा 18 ते 45
6) प्रशिक्षणार्थी संख्या – 35

प्रशिक्षणार्थीची निवड :-

प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक

पात्रता :-

18 ते 45 शिक्षण कमीत कमी 10 वी पास / नापास
शासकीय ऋण योजनेत कर्ज मंजूर झालेल्यांना अग्रक्रम
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील तरुणांना प्राधान्य

आवश्यक कागदपत्रे :-

रेशनकार्ड
दारिद्र्य रेषेखालील दाखला
आधारकार्ड
पासपोर्ट साईज 4 फोटो
पॅन कार्ड
बँक पासबुक

अधिक माहितीसाठी संपर्क…

श्रध्दा दुधे (प्रशिक्षक) : 8275167774
ऑफीस मोबाईल : 7588565741
ऑफीस फोन : 020-26821514
श्री.संजय मांढरे (संचालक) : 9921475741
श्री. संजय डगळे (प्रशिक्षक) : 9049453951

पत्ता :- 

ISO 9001 : 2015 प्रमाणित संस्था जनमंगल बिल्डिंग, स.नं. 7A / 2, किर्लोस्कर न्युमॅटिक्स समोर, औद्योगिक वसाहत, हडपसर, पुणे 411013. फोन : 020-26821514 , 26821513. ई – मेल : mrsetipune@gmail.com ग्रामीण विकास मंत्रालय (MORD) भारत सरकार पुरस्कृत,

प्रायोजक : बँक ऑफ महाराष्ट्र 

Leave A Reply

Your email address will not be published.