शेतीशिवार टीम, 31 मार्च 2022 : Aadhaar-Pan Link : केंद्र सरकारने पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.आधार ते पॅन लिंकची शेवटची तारीख 31 मार्च 2022 म्हणजे आजच =आहे. यापूर्वी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली होती. अशा परिस्थितीत, पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा परिस्थितीत वेळेत ऑनलाइन पद्धतीने पॅनला आधारशी लिंक केले पाहिजे. चला जाणून घेऊया त्याची सोपी पद्धत…
लिंक न केल्यास 10,000 रुपये दंड :-
तुम्ही पॅनला आधारशी लिंक न केल्यास, तुम्ही आयकर रिटर्न भरू शकत नाही.त्याचप्रमाणे 31 मार्चपूर्वी तुम्ही आधार कार्ड पॅनशी लिंक केले नाही तर 10,000 पर्यंत दंड आकारला जाईल.तसेच पॅन कार्ड कायमचे रद्द होऊ शकते अशी सूचना देखील दिली आहे.
पॅन आधारशी लिंक केले आहे, ते कसे कळणार :-
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही आधीच पॅनला आधारशी लिंक केले आहे, तर तुमची कंफर्म झाल नाही, तर तुम्ही 12 अंकी आधार क्रमांक आणि 10 अंकी खाते क्रमांक 567678 किंवा 56161 वर मेसेज करून तुमचा आधार पॅन शोधू शकता की लिंक आहे की नाही ? जर तुमचा आधार पॅनशी लिंक असेल, तर एक संदेश येईल की आधार आधीच पॅनशी लिंक झाले आहे.
पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी खालील लिंक करा फॉलो :-
स्टेप- 1 : तुम्ही www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटला पहिल्यांदा भेट देत असाल, तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल.
स्टेप- 2 : यानंतर तुम्हाला पॅन डिटेल्स टाकावे लागतील.त्यानंतर OTP पडताळणीनंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला खाते लॉग इन करावे लागेल.
स्टेप – 3 : जर तुमचे आधीच अकाउंट असेल तर फक्त लॉगिन वर क्लिक करा.
स्टेप – 4 : यानंतर तुम्हाला इनकम टैक्स डिपार्टमेंट ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
स्टेप – 5 : इनकम टॅक्स बॉटम असलेल्या पानावर, तुम्हाला पॅनला आधारशी लिंक करण्याचा पर्याय आहे.
स्टेप – 6 : आधार-पॅन लिंक पर्यायावर क्लिक केल्यावर, एक नवीन पेज उघडेल.
स्टेप – 7 : यानंतर पॅन क्रमांक,आधार क्रमांक आणि रजिस्टर्ड नाव टाकावे लागेल.
स्टेप – 8 : त्यानंतर तुम्हाला आधार ऑप्शन लिंकवर क्लिक करावे लागेल.
स्टेप – 9 : इनकम टॅक्स विभाग एकाच नंबरवर दोन पॅन लिंक करण्याची परवानगी देणार नाही.
SMS द्वारे करा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करा :
स्टेप 1: तुमच्या स्मार्टफोनवर Messages अँप उघडा.
स्टेप 2: एक नवीन Messages तयार करा.
स्टेप 3 : टेक्स्ट Messages सेक्शनमध्ये, UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन क्रमांक > टाइप करा आणि 567678 किंवा 56161 वर SMS पाठवा.